Spread the love

अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेचा थरार आजपासून पुण्यात रंगणार

अभिनेत्री चित्रांगदा सिंग उद्घाटन समारंभाचे प्रमुख आकर्षण
उद्घाटन समारंभात नेत्रदीपक ड्रोन शो प्रेक्षकांचे लक्ष्य वेधणार

प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे रोहित पवार यांचे आवाहन

पुणे, 3 जून2025: क्रिकेट शौकिनांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) 2025 स्पर्धेचा थरार आज (4 जून 2025) पासून महाराष्ट्र क्रिकेट संघटना, गहुंजे येथील मैदानावर रंगणार आहे. अदानी समूहाचे मुख्य प्रायोजकत्व लाभलेल्या आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत क्रिकेट शौकिकाना टी २० क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे.

महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग(डब्लूएमपीएल) स्पर्धेला 5 जून पासून प्रारंभ होणार असून एमपीएल आणि डब्लूएमपीएल या दोन्ही स्पर्धांचा शानदार उद्घाटन समारंभ आज 4 जून रोजी सायंकाळी प्रेक्षकांची मने जिंकणार आहेत. लोकप्रिय अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिची उपस्थिती आणि नेत्रदीपक ड्रोन शो ही उद्घाटन समारंभाची खास आकर्षणे ठरणार आहेत. समाजातील विविध क्षेत्रांमधील नामवंत व्यक्ती यावेळी उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र क्रिकेट संघट नेचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले की, सर्व सामान्य क्रिकेट प्रेमींनाही या उच्च दर्जाच्या भरपूर आनंद घेता यावा याकरिता सर्व प्रेक्षकांना सर्व सामन्यांसाठी विनामूल्य प्रवेश देणार आहे. तसेच, प्रेक्षकांसाठी पार्किंग व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे.

ते पुढे म्हणाले की,महाराष्ट्रातील गुणवान व उदयोन्मुख क्रिकेट पटूना पाठिंबा व प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड संख्येने स्टेडियम मध्ये उपस्थित रहावे असे आवाहन आम्ही करीत आहोत. या सर्व सामन्यांचे स्टार स्पोर्टस 2 या वाहिनावरून तसेच जियो सिनेमा वरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने पुण्याबाहेरील प्रेक्षकांना ही या सामन्यांचा आनंद घेता येणार आहे..

आज, बुधवार, 4जून रोजी सलामीच्या लढतीत रत्नागिरी जेट्स विरुद्ध इगल नाशिक टायटन्स यांच्यात लढत रंगाने असून त्यामुळे या स्पर्धेचा रंगतदार प्रारंभ होईल अशी अपेक्षा आहे.

———-