Spread the love

आकुर्डी : पिंपरी चिंचवड शहर मनसेला मोठे खिंडार पडले असून महाराष्ट्र निर्माण सेनेचे लढवय्ये कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे के के कांबळे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
आपल्या प्रवेशबाबत सांगताना के के कांबळे म्हणाले की, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने पिंपरी विधानसभा मतदार संघासाठी डॉ सुलक्षणा शिलवंत यांच्यासारख्या उच्चविद्याविभूषित, नम्र, अभ्यासू, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न जाणणाऱ्या मागासवर्गीय महिलेला उमेदवारी देऊन पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांना दिलासा निर्माण करून दिला आहे. राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने एका सर्वसामान्य महिलेला संधी दिली त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य व मागासवर्गीय मतदार अतिशय समाधानी व आनंदी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या निर्णयाचे आपण मनापासून स्वागत करून या पक्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला आहे.
पिंपरी विधानसभा मतदार संघातून यापूर्वी प्रतिनिधित्व करणारे आमदार केवळ दहशत व दडपशाही या मार्गातून स्वतःचे खिसे भरण्याचे काम करत होते त्यांना समाजाची कोणतीही कळकळ नव्हती आता डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या माध्यमातून समाजाशी नाळ जोडलेली प्रतिनिधी प्राप्त होणार असल्याने आपण राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षात सामील होत असल्याचे के के कांबळे यांनी सांगितले