
पुणे दि.३० मे: देशातली व्यावसायिकतेची परंपरा समाजातल्या काही घटकांपुरती मर्यादित न राहता इतर अपारंपारिक समाज घटकांपर्यंत पोहोचावी. शेती प्रधान देश उद्योजकता प्रधान व्हावा आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित यावे. तसेच उद्योजकता, आर्थिक स्वातंत्र्य, स्टार्टअप व नवनवीन कल्पनेला प्रोत्साहन देण्याचा मुख्य उद्देश ठेवून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्यावतीने दोन दिवसीय ‘कम्युनिटी बिल्डींग फॉर इन्कलुसिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ अॅण्ड डेव्हलपमेंट’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद ३१ मे व १ जून रोजी नाशिक येथील हॉटेल शेरेटन मध्ये संपन्न होईल. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे आणि एमआयटी स्कूल ऑफ बिझनेसचे सहअधिष्ठाता प्रा.डॉ. गौतम बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘कम्युनिटी बिल्डींग फॉर इन्कलुसिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ अॅण्ड डेव्हलपमेंट’ या परिषदेचा उद्घाटन सोहळा ३१ मे रोजी दुपारी २.३० वा. होणार आहे. यावेळी कोल्हापूर येथील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड हे असतील.
तसेच, बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक डॉ. हणमंतराव आर. गायकवाड, चितळे ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गिरीश चितळे, इंन्फोटेक सॉफ्टवेअर अँड सिस्टमचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशिम पाटील व तौराल इंडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गिते हे उपस्थित राहतील.
या परिषदेत विनजीत टेक्नॉलॉजी प्रा.लि.चे सह संस्थापक अश्विन कंडोई, नाशिक येथील सह्याद्री फर्मचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, आर्मस्ट्राँग डेमॅटिकचे चेअरमन विनीत माजगावकर, एएमटी ग्रुप कंपनिजचे संचालक चेतन सावंत, थॉयोकेअरचे संस्थापक डॉ. ए. वेलूमणी, टु ब्रदर्स ऑर्गेनिक फॉर्मचे संस्थापक अजिंक्य हांगे आणि सत्यजीत हांगे, थॅर्माकॉल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळख असणारे माने ग्रुपचे संस्थापक रामदास माने, नाशिक येथील वेदमुथा इंडिस्ट्रीज लि.चे व्यवस्थापकीय संचालक अजय वेदमुथा, टिमस लाईफ स्टाइलचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित तिवारी, स्लाइडवेल मेल्यूअर टेक प्रा.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबर प्रधान, निर्मिती प्रोमॅक कन्स्लटन्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक राहुल वैद्य हे आपली यशस्वी गाथा मांडतील.
या परिषदेचा समारोप १ जून रोजी दुपारी ३.३० वा. होणार आहे.
जनसंपर्क विभाग,
एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे.