
खेड ततालुक्यात्तहसिलदार बेडसे यांचे स्वाग आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संचलित लोक आंदोलन समिती पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाचारणे, खेड तालुका कार्यकारणी यांचे तर्फे तहसीलदार प्रशांत बेडसे यांची खेड तालुका तहसीलदार पदी फेरनियुक्ती झाल्या बद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खेड तालुका समितीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून पुन्हा खेड मध्ये नियुक्ती झाल्या बद्दल स्वागत आणि सत्कार करण्यात आला. खेड तालुक्यातील जनतेचे प्रश्न, समस्या दूर व्हाव्यात. शेतकरी आणि बाधित, तक्रारग्रस्त नागरिक यांचेवर अन्याय होऊ नये व समाज हिताच्या दृष्टीने आवश्यक असेल अशी सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत अशी मागणी या समितीचे वतीने करण्यात आली. समाज हिताची सर्व कामे लवकरात लवकर करून सर्वांना योग्य न्याय दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी समितीला दिली. आदर्श समाज सेवक जेष्ठ मार्गदर्शक अण्णासाहेब हजारेंनी दहा कायदे शासना कडून मंजूर करुण घेतले आहेत. सदरील कायद्यानची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करावेत यासाठी समितीच्या वतीने सतीश चांभारे, प्रशांत नगरकर यांनी संवाद साधला. यावेळी गोविंद बुटे, गंगाधर जैद, बबन गाढवे, प्रकाश पाचारणे, माजी सरपंच काळुराम थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते.