Spread the love

 

पुणे, प्रतिनिधी:
छत्रपती शिवाजी विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, दिनांक ३१ मे २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता, शाक्यमुनी बुद्ध विहार, हेल्थ कॅम्प – पांडवनगर, पुणे-१६ येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीचे आयोजन छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या वतीने करण्यात आले असून, आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२५ साठीची रणनीती व इच्छुक उमेदवारांची नोंदणी यावर भर दिला जाणार आहे.

बैठकीतील प्रमुख विषय पुढीलप्रमाणे आहेत:

  1. मागील बैठकीचा आढावा
  2. महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची नावे गोळा करणे

बैठकीमध्ये निवडणुकीस इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपली उमेदवारी, प्रभाग क्रमांक आणि प्रभागाचे नाव स्पष्टपणे नमूद करून आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ही नावे दिनांक २ जून २०२५ पर्यंत राज्य कार्यकारिणीकडे पाठविण्यात येणार आहेत.

कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष प्रभाकर सरोदे, महासचिव दीपक रोकडे, अशोक गायकवाड, व संघटक काका गडबडे यांनी केले आहे.

संपर्कासाठी:

  • प्रभाकर सरोदे – 9545408632
  • दीपक रोकडे – 7058671111
  • अशोक गायकवाड – 8888643939
  • काका गडबडे – 9822529837

कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहून बैठकीला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.