Spread the love

 

बोपोडी, पुणे:
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आज मानगीबाग सार्वजनिक मित्र मंडळ, बोपोडी यांच्या वतीने महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला. “जय शिवराय”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी अठरा पगड जातींना एकत्र आणणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या कार्याची आठवण करून देत, कार्यक्रमात शिवप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष विजय जाधव, शहर सरचिटणीस अमित जावीर, शिवभक्त व सामाजिक कार्यकर्ते कैलास टोनपे, राजू दादा सिंग, शैलेंद्र परदेशी, प्रदीप भाऊ चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रमात शिवचरित्राची प्रेरणा घेऊन समाजात एकोपा आणि जागरूकता वाढवण्याचा संदेश देण्यात आला. महाराजांचा जयजयकार करत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

🚩जय भवानी! जय शिवाजी!🚩