पुणे, दि. 10 : जुन्नर विधानसभा मतदारसंघात नियुक्त खर्च निरीक्षक व्यंकादेश बाबू यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे यांनी दिली आहे.
या तपासणी दरम्यान सहायक सहायक खर्च निरीक्षक संदीप ओव्हाळ, सुरेंद्र वाघमारे, खर्च ताळमेळ समितीमधील सदस्य तसेच उमेदवार व त्यांचे खर्च प्रतिनिधी उपस्थित होते.
खर्च ताळमेळ प्रकियेदरम्यान खर्चात किरकोळ तफावत आढळून आलेल्या उमेदवारांना दुरूस्तीबाबत तसेच अशी तफावत यापुढे होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. खर्च तपासणीसाठी अनुपस्थित असलेले अपक्ष उमेदवार शरद शिवाजी सोनवणे, शरद बाबासाहेब सोनवणे आणि आकाश राजेंद्र आढाव यांना खर्च न सादर केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती श्रीमती घाटगे यांनी दिली.
सर्व उमेदवारांच्या निवडणूक विषयांच्या खर्चाची दुसरी तपासणी १३ नोव्हेंबर २०२४ रोजी तर तिसरी तपासणी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी होईल असेही श्रीमती घाटगे यांनी यावेळी सांगितले.