खडकी : आजचा हा दिवस आपल्या सर्वान साठी प्रेरणा दिवस असून महिलांच्या शिक्षणाचे द्वारे खुले करणारे फुले दापंत्यच आपले खरे आदर्श आहे. सावित्रीमाई फुले यांच्या मुळेच महिला वर्ग आणि सुशिक्षित वर्गाचा विकास झाला आहे. ती माउली शिकली म्हणून आपण घडलो, त्यांच्या मुळेच आपले अस्तित्व आजही आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे असे मत माजी आमदार दीप्ती चवधरी यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले महिला मंडळ औंध रोड, पडाळ वस्ती, बोपोडी येथे विविध क्षेत्रात अनमोल कामगिरी करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी चवधरी बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दत्ता बहिरट, अध्यक्षस्थानी सुवर्णा पांडुळे, ऍड. रमेश पवळे, उपप्राचार्य अरुण शेलार, ऍड. नंदलाल धीवार उपस्थित होते.
यावेळी प्रसिद्ध समाजसेवक डॉ. विजय ढोबळे, डॉ. स्वाती बढे, डॉ. प्रियांका पवळे, ऍड. पूजा सहारे, समाजसेविका दिलशाद अत्तार, धम्मभगिनी शकुंतला शेलार, निर्मलाताई भालेराव, पत्रकार मानसी शिंदे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात राजेंद्र भुतडा, विशाल जाधव, कांता ढोणे, सुंदर ओव्हाळ, ज्योती परदेशी, रतन भंडारे, मनीषा ओव्हाळ, अंजली दिघे, प्रशांत टेके, सादिक शेख, महंमद शेख, कल्पना शंभरकर, संतान पिल्ले, मंगल जाधव, अश्विनी चोपडे, पूजा सरोदे, किरण आंबिडे, पूजा जगताप, अजित थेरे, सुनील भालेराव, गणेश गायकवाड, सुमित पांडुळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शशिकांत पांडुळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता सूर्यवंशी, सूत्रसंचालन इंद्रजित भालेराव यांनी मानले.