Spread the love

 

पिंपरी विभागाचा आजपर्यंत चा विकास लक्षात घेता, विकासकामे कोठेही दिसत नाहीत खरंतर डॉ.सुलक्षणा शिलवंत यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने पिंपरी विभागाचा विकास होऊ शकतो आणि डॉ.सुलक्षणा शिलवंत पिंपरी विधानसभेच्या खऱ्या मानकरी असून या पिंपरी विधानसभेचे कार्य करण्याचे सामर्थ्य त्यांच्या मध्ये आहे, कारण त्यांच्या वडिलांचे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या कार्याची जाणीव आजही जनतेला आहे.वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून विकासाचा रथ त्या अश्याच पुढे नेत राहतील याची आम्हाला जाणीव आहे.

त्यामुळेच डॉ.सुलक्षणा शिलवंत यांना पिंपरी विधानसभेत पाठिंबा देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी भीमशक्ती संघटनेच्या वतीने चंद्रकांत हांडोरे यांच्या आदेशानुसार आम्ही पाठिंबा देत आहोत.

पाठिंब्याचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष विनोद चव्हाण यांनी दिले असून या पत्रामध्ये बाळासाहेब वाघमारे, विनोद चव्हाण, अंकुशराव सोनावणे, प्रदीप कांबळे इत्यादींच्या स्वाक्षरी आहेत.