
पुण्याची ओळख ऐतिहासिक व सांस्कृतिक व शैक्षणिक शहर अशी आहे व सध्या कोथरूडची ओळख सांस्कृतिक पुण्यातील सांस्कृतिक राजधानी अशी झालेली आहे आणि पुणे शहराबरोबरच आपल्या कोथरूडमध्ये देखील दिवसेंदिवस ड्रग्जचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे लहान मुले तरुण वर्ग व महिला यांच्याभोवती या विघातक गोष्टीचा विळखा अधिकाधिक घट्ट होताना दिसत आहे वेळीच उपाययोजना केली नाही तर याचा भस्मासुर होऊन भारताची भावी पिढीच नष्ट होईल की काय अशी भीती वाटण्या इतकी भयावह परिस्थिती आहे या पार्श्वभूमी वरती पाच संस्थांनी एकत्रित येऊन पुढाकार घेऊन याविषयी जनजागृती करण्याचे ठरवले आहे ज्याला अनेक गणेश मंडळे स्वयंसेवी संस्था व समाजातील इतर घटकांचाही पाठिंबा आहे व त्यासाठी ते सक्रिय सहकार्य करायला ही तयार आहेत याचा याचाच एक भाग म्हणून किंवा पहिला टप्पा म्हणून मंगळवारी 11 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सर्व कोथरूडकारांनी हुतात्मा राजगुरू स्मारक करिष्मा चौक कोथरूड येथे मोठ्या संख्येने जमावे व ड्रग्स मुक्त कोथरूड साठी शपथ घ्यावी असे नियोजन आहे दुसरा टप्पा हा या सर्व सृजनशक्ती नी एकत्रित येऊन 26 जून पर्यंत जनजागृती करणे मग ती शाळा महाविद्यालय हास्य क्लब भजनी मंडळे नागरिक विशेषतः तरुणाई व महिलांसाठी प्रबोधन वर्ग अशा स्वरूपामध्ये असेल या सर्व उपक्रमांमध्ये कोथरूड चे आमदार व उच्च तंत्र शिक्षण मंत्री हे देखील मार्गदर्शन करणार आहेत व शाळा निहाय अभ्यासक्रमामध्येच या विषयाचा समावेश करता येईल का? यासाठी देखील सक्रिय प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने देखील यात सकारात्मकतेने सहभागी होऊन आपले योगदान देण्याचे ठरवले आहे तसेच लवकरच जे या विळख्यात अडकले आहेत व त्यातून सुटू पाहतात त्यांच्यासाठी एक हेल्पलाइन सुरू करण्यात येईल व जी रिहॅबिलिटेशन सेंटर कार्यान्वित आहेत त्यांच्याशी देखील जोडून देऊन या मंडळींना यातून पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी देखील काम करण्यात येईल 26 जून व त्यानंतरचा टप्पा हा लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल
११ मार्च २०२५ रोजी ना चंद्रकांतदादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा आमदार कोथरूड, अभिनेते अजय पुरकर व क्राईम ब्रांच डीसीपी पिंगळे सर हे सर्वजण उपस्थित राहणार असून जनसमुदायाला संबोधित करणार आहेत.