Spread the love

पुणे: दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेणाऱ्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी त्यांचे हयातीचे दाखले पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह पुणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत प्रत्यक्ष जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल स. दे. हंगे (नि.) यांनी केले आहे.

पोस्टाने हयातीचे दाखले पाठविणाऱ्या लाभार्थ्यांनी ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत दाखले पोहचतील याची दक्षता घ्यावी. हयातीचे दाखले विहित मुदतीत पुणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास प्राप्त होणार नाहीत अशा लाभार्थ्यांचे अनुदान माहे डिसेंबर २०२४ पासून बंद करण्यात येईल. हयातीचे दाखले प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांना फरकासह अनुदान देण्यात येईल. तसेच ज्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, अशा लाभार्थ्यांचा मृत्युचा दाखला अर्जासहीत त्यांच्या अवलंबितांनी जमा करावा, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.