Spread the love

 

पुणे – बोपोडीतील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते नितीनभाऊ मरपाळे यांचा वाढदिवस न्यू बोपोडी सोशल कट्टा परिवाराच्या वतीने बोधी वृक्षाखाली जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून मरपाळे यांना शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी ज्येष्ठ नेते बी. एम. कांबळे आणि सुरेश पवार यांनी धार्मिक उपरणे देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच ऍड. विठ्ठल आरुडे व सौ. शोभा आरुडे यांनी शाल देऊन मरपाळे यांचा सन्मान केला.

कार्यक्रमात दादा भोसले, काँग्रेस नेते महंम्मद शेख, आयोजक अंकुशराव साठे, ऍड. विठ्ठल आरुडे यांनी केक कापून उपस्थितांना स्नॅक्स देत कार्यक्रम गोड केला.

या प्रसंगी अतुलभाऊ गायकवाड, रफिक शेख, तुषार मोहिते, विजय गायकवाड, करीम तुर्क, रवी नायर, तन्मय गवंडे, सिद्दीक पठाण, राहुल वाघमारे, राजू जाधव, ऍड. योगीराज पिल्ले, शशिकांत ओव्हाळ, मुश्ताक शेख, अस्लमभाई शेख, अजय स्वामी आणि शत्रुघ्न कसोटे आदी कार्यकर्ते व नेते उपस्थित होते.

कार्यक्रमाची संयोजन उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले असून सर्व उपस्थितांनी नितीनभाऊंना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.