
पुणे, :
गुरुवारी पुण्यात झालेल्या जोरदार पावसामुळे 54/54 भाऊ पाटील चाळ बोपोडी परिसरात नागरिकांचे मोठे हाल झाले. ड्रेनेज जाम झाल्यामुळे वस्तीमध्ये सांडपाण्याचे तळे साचले होते, तर काही नागरिकांच्या घरात पाणीही शिरले. पहिल्याच पावसात पुणे महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर त्वरित परिस्थितीची दखल घेऊन सकाळी नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले. माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, शशिकांत ओव्हाळ, मंगेश गायकवाड, प्रमोद शिरसाठ आणि मयुरेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून हे काम वेगाने मार्गी लागले.
मरियम शेख,सीता रणदिवे, फ्लोरिना मोजेस, हसीना सय्यद, श्वेता मोहिते
उषा पिल्ले, कमल ओव्हाळ या महिलांनी तक्रार केली होती.
या अअनपेक्षित आणि धोकादायक परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना असून, पुणे मनपाने वेळेत व प्रभावी नालेसफाई न केल्यामुळे या समस्येची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त होत आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे पुढील काळात योग्य नियोजन आणि तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.