पिंपरी
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर
यांनी नुकतीच पिंपरी येथील भाजी मंडई ला भेट दिली.
यावेळी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी चा नाद संपूर्ण परिसरात दुमदुमत होता, पिंपरी येथील अतिशय मध्यवर्ती अशा ठिकाणी असलेल्या भाजी मंडई मध्ये सकाळी सकाळी डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांचे आगमन होताच भाजी विक्रेते, फळ विक्रेते, यांनी एकच धुमाकूळ घालत संपूर्ण परिसर डोक्यावर घेतला. उपस्थित असल्येल्या ग्राहकांनी देखील रामकृष्ण हरी वाजवा तुतारी च्या स्वरामध्ये आपला स्वर चढवला.
स्तब्ध व अवाक होऊन येणारे जाणारे नागरिक घोषणा देत डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते. यंदा परिवर्तन निश्चित अशी चर्चा करत महाविकास आघाडीचा विजय असो, “सुलक्षणा ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी पिंपरी भाजी मंडई व आसपासचा संपूर्ण परिसर आज वेगळ्याच रंगात आणि ढंगात रंगून गेलेला दिसत होता.
सर्व सामान्य कष्टकऱ्यांचा प्रतिसाद पाहून डोळ्यांचे पारणे फिटले अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत सर्व उपस्थित असणाऱ्या ग्राहक, विक्रेते यांचे आभार मानले. मंडई मधील सर्वसामान्य कष्टकरी यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असा शब्द दिला. आपण सर्व सोबत राहून येत्या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवणारच असा विश्वास व्यक्त केला.
विक्रेत्यांनी तसेच नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की एक उच्चशिक्षित महिला उमेदवाराकडून आम्हाला खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांच्या रूपाने आमच्या अपेक्षा पूर्ण होणार याची आम्हाला खात्री आहे.म्हणून आम्ही सर्व मिळून महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन बदल घडविणार.