
पुणे – पुणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त मा. नवलकिशोर राम यांची आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते व माजी नगरसेवक मा. गोपाळ दादा तिवारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत पुण्यातील वाढत्या वाहतूक समस्यांबाबत तसेच शहरातील विविध प्रलंबित विकासकामांवर लक्ष केंद्रीत करण्याबाबत निवेदन आयुक्तांना देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाने आयुक्तांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या.
या भेटीत काँग्रेस पक्षाचे लीगल सेलचे प्रदेश सचिव तसेच राजीव गांधी स्मारक समितीचे सदस्य मा. अॅड. फैयाज भाई शेख यांनीही उपस्थित राहून आयुक्तांना शुभेच्छा दिल्या.
शिष्टमंडळात काँग्रेसचे कार्यकर्ते संजय अभंग, गणेश मोरे, गणेश शिंदे, अॅड. श्रीकांत पाटील, योगेश भोकरे आणि धनंजय भिलारे यांचा समावेश होता.
शहराच्या विकासाबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये सकारात्मक संवाद होणे आवश्यक असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.