
पुणे (दि.४) पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी नागपूर येथे केलेल्या उल्लेखनीय पोलीस कारवाई बद्दल त्यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या अनुषंगाने बाळासाहेब दाभेकर, अंकुश काकडे व सतीश गोवेकर मित्रपरिवाराने त्यांचा पोलीस उपयुक्त संदीपसिंह गिल्ल यांच्या हस्ते नागरी सत्कार केला. हॉटेल मौर्य येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सत्कारमूर्ती मच्छिंद्र पंडित, पंडित वाघ, ठोंबरे, मावळे, घाडगे, कडू, येनपुरे, संजय उभे, तुषार पाटील, बापूसाहेबभेगडे, बाळासाहेब बोडके, धनंजय वाडकर, निरंजन दाभेकर, बाळासाहेब जाधव, राजेंद्र जाधव, राजेंद्र जाधव, विजय बोंद्रे, राजू लव्हाटे, उमेश मिस्त्री, चंदन बकरे, अतुल बेहरे, दीपक खेडेकर, सुधीर शिंदे, अजित दरेकर, दत्ता सागरे, मनोज डोंगरे, अंबर भाऊ, मुकुंद दादा पंडित, निलेश वावरे आदी मान्यवर उपस्थित होते. शाल,श्रीफळ पुष्प गुच्छ शिंदेशाही पगडी व स्मृतीचिन्ह असे सत्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी बोलतांना संदीपसिंह गिल्ल यांनी मच्छिंद्र पंडित यांचे अभिनंदन केले व भावी कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देतांना मच्छिंद्र पंडित यांनी सत्कार अनेक ठिकाणी व संस्थांकडून होतात मात्र मित्र परिवाराने केलेला सत्कार हा अधिक भावतो व भावी कामास बळ देतो असे सांगितले. कार्यक्रमाची प्रस्तावना अंकुश काकडे यांनी केली तर आभार प्रदर्शन अजित दरेकर यांनी केले. स्नेह्भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
छायाचित्र : डावीकडून बाळासाहेब दाभेकर,अंकुश काकडे, मच्छिंद्र पंडित, संदीपसिंह गिल्ल,सतीश गोवेकर,अजित दरेकर.