पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयात सर्व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना आचारसंहिता, प्रचार आणि निवडणूक खर्चाबाबत निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी मार्गदर्शन करून नियमांची माहिती दिली.
यावेळी निवडणूक खर्च समन्वय अधिकारी कमल किशोर राठी, सहाय्यक खर्च समन्वय अधिकारी योगेश तावरे, विनोद शिंदे, मधुकांत प्रसाद, माध्यम समन्वय अधिकारी प्रज्ञाराणी भालेराव, सहायक समन्वयक नीता पाटील, मोनिका मस्के उपस्थित होते.
श्री. भंडारे यांनी मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक उमेश कुमार यांच्यामार्फत होणाऱ्या उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीच्या वेळापत्रकाबाबत माहिती दिली. खर्च तपासणीसाठी निश्चित केलेल्या ९, १३ व १७ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत खर्च प्रतिनिधींनी निवडणुकीसंदर्भात खर्चाचे सर्व दस्तऐवज, दैनंदिन खर्च नोंदवही, मूळ प्रमाणके, अद्ययावत बँक स्टेटमेंट, पासबुकसहित वेळेत कॅन्टोन्मेंट विधानसभा निवडणूक कार्यालयातील खर्च नियंत्रण कक्षात उपस्थित राहण्याच्या सूचना श्री. भंडारे यांनी दिल्या.