
पुणे : प्रेमाचा उत्सव साजरा करण्यासाठी अल्पावधीतच पुणेकरांच्या पसंतीस ठरलेले वाकड येथील फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम येथे बहुप्रतीक्षित सेफोरा फ्रेगनंस फेस्टीवल आयोजित करण्यात आला आहे. हा फेस्टीवल१६ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. सुगंध प्रेमींसाठी हा रोमांचक फेस्टीवल अविस्मरणीय अनुभवाचे घेऊन येणार असून या ठिकाणी प्रसिद्ध ब्रँड्सकडून विशेष ऑफर देण्यात येत आहे.
या सेफोरा फ्रेगनंस फेस्टीवल मध्ये महोत्सवात विविध प्रतिष्ठित ब्रँडच्या आकर्षक श्रेणी दिसेल, ज्यात गिव्हेन्शी, ह्युगो बॉस, जिमी चू, व्हर्सेस, फेरागामो आणि कॅल्विन क्लेन (CK) यांचा समावेश आहे. खरेदीदारांना विविध प्रकारचे लक्झरी फ्रेगनंस आणि त्यांचा परिपूर्ण सुगंध शोधण्याची संधी मिळेल. कार्यक्रम आणखी खास करण्यासाठी उपस्थितांना दररोज आयोजित मास्टरक्लासमध्ये भाग घेता येईल, जिथे तज्ञ फ्रेगनंसची निवड, लेयरिंग आणि ट्रेंड्सवरील आपले ज्ञान आणि अंतर्दृष्टी शेअर करतील.