पुणे-:-बहूप्रतिक्षित आणि पुणेकरांची लोकप्रिय असलेल्या 18व्या भीमथडी जत्रेचे काल मा. मीनाक्षी ताई लोहिया – सी इ ओ – खडकी काँटोंनमेंट बोर्ड, यांचे हस्ते व मा. सूनदाताई पवार यांचे उपस्थितीत झाले. या वेळी मा राजेंद्र दादा पवार,खडकी काँटोंनमेंट बोर्डाच्या सदस्य मा पूजा आनंद, प्राचार्य डॉ प्रमोद पाटील, बँक ऑफ महाराष्ट्रचे मा पाटील साहेब, अवनी डेव्हलपरचे मा श्री नाईक सर, चंदू काका सराफचे मा सिद्धार्थ शहा, मा सई ताई पवार , मा कुंती पवार यांचेसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना मा. सुनंदा ताई म्हणाल्या की, चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांमध्ये भरड धान्य वापराचे प्रमाण वाढले आहे.भीमथडी जत्रेत या वर्षी मिलेट आईस्क्रीमचा स्टॉल लावला आहे. या वर्षी भीमथडीतून तयार होणारा प्लास्टिक बाटली व फ्लेक्स कचऱ्याचे रिसायकल होणार आहे. ओला सुका कचरा पुणे मनपा स्वच्छता विभाग घेऊन जाणार आहे. ग्रामीण भागातील महिलांनी बनविलेले उन्हाळ काम, सेंद्रिय हळद, जी आय मानांकन पदार्थ हे सर्व नियंत्रित दरात पुणेकरांना उपलब्ध होणार आहेत. या शिवाय भीमथडी फौंडेशनचे सर्व पदार्थ लॅब टेस्टिंग केलेले आहेत. दिनांक 25 डिसेंम्बर 2024 पर्यंत चालणारी ही भीमथडी
या वर्षी डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या 25 व्या पुण्यतिथी निमित्त शेती ही थीम घेऊन सकारली आहे. मा आप्पासाहेब यांनी शेती व शेती तंत्रज्ञान यामध्ये शेतकऱयांसाठी काम केलेले असल्याने शेती ही थीम घेऊन या वर्षी भीमथिडीत शेतकरी समृद्ध व तंत्रस्नेही होईल यासाठी या भीमथडीत विविध प्रयोग केले आहेत. जसे की प्रवेश केल्याबरोबरच अप्पासाहेब पवार दालन, मधुमक्षिका पालन दालन अशी उभारली आहेत.