Spread the love

पुणे : महाराष्ट्रातील भाजप, महायुती  सरकारने येथील हिरा व्यापार, औद्योगिक कंपन्या, दूध उद्योग हे महाराष्ट्रातून गुजरातला जाऊ दिले. कॉँग्रेसचा इतर राज्यांच्या विकासाला औद्योगिकीकरणाला विरोध नाही. मात्र महाराष्ट्रात येवू घातलेले उद्योग गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्राचा आर्थिक कणा मोडण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. 2019 मध्ये जेव्हा भाजप सारकारकार सत्तेत आले तेव्हा त्यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही एक  ट्रीलीयन डॉलर इतकी  वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पाच वर्षात ही परिस्थिती माहाराष्ट्राच्या वाट्याला आली आहे. भाजपने मतांसाठी दिलेली आश्वासन ही खोटी असल्याची टीका करत  ज्या ठिकाणी जे उद्योग आलेले आहेत किंवा येणार आहेत ते उद्योग गुजरातला पळवून घेऊन जाणे चुकीचे असल्याचे मत  छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी. एस. सिंगदेव यांनी बुधवारी व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी. एस. सिंगदेव यांनी कॉँग्रेस भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी अखिल भारतीय कॉँग्रेस महासमितीच्या राष्ट्रीय प्रवकत्या डॉ. शमा मोहंमद,  महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, कर्नाटक कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते सूरज हेगडे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अरविंद शिंदे आदि उपस्थित होते.

पुढे बोलताना टी. एस. सिंगदेव  म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ‘महाराष्ट्र नामा’ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या शंभर दिवसांत अडीच लाख सरकारी नोकर भरतीची प्रक्रिया राबावण्याचे आम्ही आश्वासन दिले आहे. तसेच पुढील पाच वर्षांचे नियोजन देखील दिले आहे. तर 2030 पर्यंत महाराष्ट्राला पर कॅपिटल इनकम मध्ये अव्वल क्रमांकावर घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे.

भाजप, महायुती सरकारच्या धोरणावर टीका करताना टी. एस. सिंगदेव म्हणाले, महायुतीचे सरकार राज्यात आल्यानंतर पुण्यातील हिंजवडी भागातून 37 आयटी कंपन्या तर चाकण औद्योगिक वसाहती मधून 50 औद्योगिक कंपन्यांनी स्थलांतर केले आहे. वेदान्त – फॉक्सकॉन, टाटा एअर बस इतकेच काय  महाराष्ट्राचा  डेअरी   उद्योग गुजरातच्या घश्यात घालण्याचा उद्योग भाजपने केला आहे. धारावी मध्ये एक मिलियन ची अर्थव्यवस्था आहे, तिथल्या नागरिकांना विस्थापित करून ती जमीन एका उद्योजकाला देण्याचा तसेच त्या प्रकल्पाच्या आजूबाजूच्या जमिनीही त्याच ग्रुपला देण्याचा डाव महायुतीने रचून महाराष्ट्रचे आर्थिक नुकसान केले आहे.

देशात सेमीकंडक्टर चे पाच मोठे प्रोजेक्ट येत आहेत, ज्यातून साडे तीन हजार कोटींची अर्थव्यवस्था आणि लाखों रोजगार निर्माण होत आहेत. मात्र  त्यातील चार केवळ गुजरात या एकाच राज्यात का? देण्यात येत आहेत. मुंबईतील हीरे व्यापार पळवून नेतान सुरतला डायमंड बोर्स साठी पोषक वातावरण नसतानाही केवळ दोन लोकांना खुश करण्यासाठी हे नेण्यात आल्याचेही टी. एस. सिंगदेव यांनी नमूद केले.