Spread the love

महाराष्ट्राचा सुपुत्र न्या. भूषण गवई यांची सरण्यायधीश म्हणून निवड झाल्याबद्दल आनंदोस्तव साजरा…
न्या. भूषण गवई यांची सरण्यायाधीश म्हणून निवड झाल्याबद्दल न्यू बोपोडी सोशल कट्टा परिवार आणि आर. पी. आय. पुणे शहर उपाध्यक्ष रवी एम. कांबळे यांच्या वतीने सर्व प्रथम विश्व्रत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दापोडी येथील पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आलाआणि बाबासाहेबांचा जय जयकार करुन पेढे वाटप करुन आनंदोस्तव साजरा केला. या नंतरन्यू बोपोडी सोशल कट्टा बोधी वृक्षाखाली सर्व पक्षीय कार्यकर्तेनि आनंदोस्तव साजरा केला. या वेळी ऍड. रमेश पवळे सर, अंकुशराव साठे, ऍड. नंदलाल धिवार. विजय जाधव आदींनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमास मोहनराव म्हस्के, रवी कचरे, सुंदर ताई ओव्हाळ,रवींद्र गायकवाड, बी. एम. कांबळे, सुरेश पवार, नितीन मरपाळे, विनोद सोनवणे, रफिकभाई शेख, विजय जगताप, सादिक शेख, शंकरराव कांबळे विजय गायकवाड, करीम तुर्क, विलास मोरे, दादा भोसले आदी नेते कार्यकर्ते उपस्थित होते….