Spread the love

पुणे : कशीश सोशल फाउंडेशन आणि कशीश प्रोडक्शनच्या वतीने महिला अत्याचारा विरोधात जनजागृतीसाठी ‘स्काय गोल्ड मिस, मिसेस, मिस्टर,किड्स इंडिया ईलाईट’2024 सीझन -2 फॅशन शो चे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी स्काय गोल्ड चे डायरेक्टर आनंद शंकर माळी, शोरुम हेड सादिक, शमीम, वेलनेस वर्ल्ड च्या डॉ. अर्चना माळी आणि स्वरूप रॉय आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पॅडमॅन योगेश पवार म्हणाले, अलीकडच्या काळात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे की असे प्रकार घडण्या पासून थांबवणे. या फॅशन शो च्या माध्यमातून आम्ही नागरिकांमध्ये या विषयी जनजागृती करण्याचे काम करणार आहोत.

‘स्काय गोल्ड मिस,मिसेस,मिस्टर, किड्स इंडिया ईलाईट’ -2024 सीझन -2 फॅशन शो येत्या 9 डिसेंबर रोजी एल्प्रो मॉल सभागृह, चिंचवड येथे पार पडणार आहे. महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात ‘महिला सुरक्षा’ या थीमवर एक फॅशन वॉक करण्यात येणार आहे, स्पर्धेत 100 पेक्षा अधिक स्पर्धकांचा समावेश असल्याचेही पवार यांनी सांगितले.

स्काय गोल्ड चे डायरेक्टर आनंद माळी म्हणाले, बाल, महिला अत्याचाराच्या घटना अलीकडच्या काळात वाढत आहेत, त्या बद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न करणे हे खरेच कौतुकास्पद आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही या फॅशन शोचा एक भाग होता आले याचा आनंद वाटतो. प्रत्येक महिला स्पर्धकाला ज्वेलरी शूट देण्याचे वचन सुद्धा स्काय गोल्डच्या वतीने ह्यावेळी माळी ह्यांनी दिले.