
माहेश्वरी भुतडा समिती, पुणे – नवीन कार्यकारिणीची निवड; दीपक भुतडा अध्यक्षपदी
पुणे : पुणे शहर जिल्हा माहेश्वरी भुतडा समितीची सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. यावेळी आगामी ३ वर्षांच्या कार्यकाळासाठी (२०२५ ते २०२८) नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. समाजहितासाठी कार्यरत असलेली ही संस्था गेली २५ वर्षांहून अधिक काळ विविध उपक्रम राबवत आहे.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
- अध्यक्ष : दीपक लक्ष्मीनारायण भुतडा
- उपाध्यक्ष : सुनिल रामकिसन भुतडा
- सेक्रेटरी : राजेंद्र रतनलाल भुतडा
- कार्याध्यक्ष : पुरुषोत्तम भुतडा
- खजिनदार : श्यामलाल भागीरथ भुतडा
कार्यकारिणी सदस्य:
- ओमप्रकाश भगवानदास भुतडा
- कन्यालाल भुतडा
- हिमांशू भुतडा
- निलेश भुतडा
- द्वारकादास भुतडा
- नंदकिशोर पूनमचंद भुतडा
सामाजिक कार्याची परंपरा पुढे
माहेश्वरी भुतडा समिती ही सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून, समाजोपयोगी विविध उपक्रम राबवण्यास नेहमीच पुढाकार घेत आली आहे.
पुढील काळात संकल्पबद्ध कार्य
सभेत बोलताना नवनिर्वाचित सेक्रेटरी राजेंद्र भुतडा यांनी सांगितले की, “समाजहिताची योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी सर्व सदस्यांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. आपली समिती हा समाजसेवेचा एक महत्वाचा मंच आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मावळते अध्यक्ष ओमप्रकाश भुतडा यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्यामलाल भुतडा यांनी केले.
समाजात सकारात्मक ऊर्जा
नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे समाजात नवचैतन्याची लहर असून, आगामी काळात समितीच्या माध्यमातून आणखी प्रभावी व समाजहिताचे उपक्रम राबवले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.