
बोपोडी : माता रमाईच्या त्यागातून आजच्या समाजाला समृद्ध आणि जागरूक करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान मध्ये महिलांना सर्वोच्च स्थान दिले त्या मुळे त्यागमूर्ती मातोश्री रमाई यांना अभिवादन करण्यासाठी बोपोडीतील मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने पुणे शहर जिल्हा पश्चिम महाराष्ट्र यांच्या विद्यमाने समाजातील कर्तृत्वान महिलांचा सन्मान सोहळा आणि अभिवादन सभेचे आयोजन बोपोडी येथील महात्मा फुले हॉल मध्ये करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आनंद कांबळे प्रमुख वक्ते ऍड. रमेश पवळे, माजी आमदार ऍड. एल टी सावंत,बौद्धाचार्य मनोहर शेलार, डॉ. विजय ढोबळे,समितीचे अध्यक्ष भीमराव सोनवणे, चिटणीस अंकुश साठे, सुरेश रोकडे, वनवर्धनीचे अध्यक्ष विजय ढोणे, इंद्रजित भालेराव, महेंद्र कांबळे, इत्यादी उपस्थित होते.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रमाईच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सन्मान सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. या वर्षीचा रमाई गौरव पुरस्कार पुणे मनपाच्या कामगार युनियन मध्ये उपाध्यक्ष पदावर कार्य करणाऱ्या समाजसेविका शोभाताई पांडुरंग बनसोडे यांना ऍड. एल टी सावंत आणि ऍड. रमेश पवळे सर यांच्या हस्ते स्मुर्तिचिन्ह पंचशील, पुषपगुच्छ देऊन करण्यात आला. तसेच समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या माता भगिनींचा डॉ. अनुपमा ढोबळे ( कोहले ), छायाताई जाधव, कमलताई कदम, मालनताई गायकवाड, धम्मसेवीका सुजाताताई सोनकांबळे, समाजसेविका सुंदरताई ओव्हाळ, यांना स्मुर्तिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. आणि ज्यांची नोटरी पदावरती नियुक्ती झाली असे ऍड. विठ्ठल आरुडे, जनसंपर्क अधिकारी संजय मोरे,समाजसेवक विजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सादिकभाई शेख यांना देखील स्मुर्तिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत अंकुश साठे, प्रास्ताविक भीमराव सोनवणे, सूत्रसंचालन दत्ता सूर्यवंशी आणि आभार मुकेश यादव यांनी मानले.