Spread the love

‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ची ​नव वैचारिक पेरणी होणार

‘भैय्यांची गॅरंटी’ला उस्फुर्त प्रतिसाद

पुणे,  : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासगंगा पोहचवण्याचा मुख्य उ​द्देश डोळ्यासमोर ठेवून ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ ही सामाजिक समतेची वैचारिक पेरणी येत्या काळात होईल. या नव वैचारिक बीजारोपणातून वडगाव शेरीत विकासपर्वाचा उदय होईल, अशी भावना बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आणि वडगाव शेरीचे उमेदवार डॉ.हुलगेश चलवादी यांनी बुधवारी (ता.१३) व्यक्त केली. बसपाचा विजय सुनिश्चित असून पक्षाचा पहिला आमदार वडगाव शेरीतील सुज्ञ मतदार कायदेमंडळात पाठवतील,असा विश्वास यानिमित्ताने डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला.

वडगाव शेरीत सुरुवातीपासून प्रचारात आघाडीवर असलेले डॉ.चलवादी घरोघरी जावून तसेच विविध सामाजिक संस्था आणि लोकवस्तींमधे जावून आपले प्रचारातील मुख्य मुद्दे मतदारांना पटवून सांगत आहेत. जनतेचे मिळणारे प्रेम त्यांच्या विजयाची पोहच पावती असल्याची चर्चा त्यामुळे मतदार संघात सुरू आहे. महायुती असो वा महाविकास आघाडी सर्वच राजकीय पक्षांकडून समाजातील सामाजिक, आर्थिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न झाला नाही. ही विषमता दूर करण्यासाठी ​विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. पीडित, शोषित, उपेक्षितासह सर्वजनांना ‘भैय्यांची गॅरंटी’ ​आश्वासक आणि दिलासादायक ऊर्जा देणारी आहे,असा विश्वास डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला.

सैनिक नगर येथील बाईक रॅली असो की धनलक्ष्मी सोसायटी, सोमनाथ नगर, येरवडा, पंचशील नगर, शांती नगर, आंबेडकर सोसायटी सह मतदार संघातील विविध भागांमध्ये डॉ.चलवादींच्या प्रचार ​अभियानाला मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद मतदारांच्या प्रेमाची पोहच असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. या प्रेमाचा कौल मतपेट्यांमधून देखील डॉ.चलवादींच्या बाजूला ​राहील ,असा विश्वास सर्वसामान्य व्यक्त करीत आहेत.

५०० रुपयांना सिलेंडर देणे हे केवळ आश्वासन नाही, तर वाढत्या महागाईमुळे पिचल्या गेलेल्या आई-बहिणींच्या चेहऱ्यावरील चिंता कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मोफत लॅपटॉप देण्याच्या गॅरंटी मध्ये होतकरू,गोरगरिब विद्यार्थ्यांच्या काबाडकष्ट करणाऱ्या वडिलांच्या मेहनतीला केलेला दंडवत नमस्कार समाविष्ठ आहे. नवीन शाळा,महाविद्यालये निर्मितीच्या गॅरंटीत परिसरातील नव शैक्षणिक क्रांतीची मुर्हूतमेढ आहे.मोफत आरोग्य विमा, एक लाख वृक्षारोपण, दरवर्षी २,५०० हजार रोजगार निर्मिती, २ लाख सीसीटीव्ही कॅमेरे, २४ तास मोफत पाणी पुरवठा, विविध समाजाच्या सांस्कृति​क, सामाजिक कार्यक्रमांसाठी बहुद्देशीय समाजभवन उभारणीची गॅंरटी सर्वजनहित समाविष्ठ करणारी आणि सर्वांना विकासाच्या धाग्यात जोडणारी आहे, असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.