पुणे, दि. १५: #वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व नमुना १२ ड भरून दिलेल्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदार असे एकूण २८ मतदारांनी गृह मतदानप्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बजावला.
विधानसभा मतदासंघात एकूण ३१ मतदारांनी घरातूनच मतदानाचा हक्क नमुना १२ ड भरून दिलेला होता, त्यापैकी २८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
गृहमतदान प्रक्रियेकरीता दोन पथके नियुक्त करण्यात आली होती. त्यामार्फत मतदाराच्या घरी जाऊन मतदान नोंदविण्यात आले. पथकात एक मतदान अधिकारी, एक इतर अधिकारी, पोलिस कर्मचारी, शिपाई, व्हिडीओग्राफर व सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांनी दिली.