पुणे: वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात स्वीप पथकांच्यावतीने संत तुकाराम महाराज मंदिर, लोहगाव तसेच ५० टक्के पेक्षा कमी मतदान असणाऱ्या मतदान केंद्राच्या परिसरात रामवाडी मेट्रो स्टेशन येथे मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी नागरिकांसोबत मतदार जनजागृती रॅली काढून येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी शंभर टक्के मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली. यावेळी क्षेत्रीय कार्यालयाचे समाजसेवक पांडुरंग महाडिक, समूहसंघटिका प्रतिभा धिवार, बचत गटातील महिला, समाज विकास विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.