Spread the love

 

पुणे, प्रतिनिधी:
शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडणारा आणि शहरवासीयांना ताज्या व सेंद्रिय शेतमालाची हमी देणारा “शेतकरी आठवडी बाजार” आता औंधमध्ये सुरु होत आहे. हा उपक्रम शनिवार, दिनांक ३१ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता औंध येथील अमेय अपार्टमेंटसमोर, मेडिपॉईंट हॉस्पिटल रोड येथे भव्य उद्घाटन समारंभाने सुरू होणार आहे.

या आठवडी बाजारात सर्व प्रकारचा भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य, सेंद्रिय व गावरान उत्पादने स्थानिक शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत रास्त दरात उपलब्ध होणार आहेत. बाजार दर प्रत्येक शनिवार, दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

शुभारंभ ऑफर:

उद्घाटन निमित्ताने ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर करण्यात आली आहे:

  • मेथी – २० गड्ड्या
  • कोथिंबीर – २० गड्ड्या
  • पालक – २० गड्ड्या
  • टोमॅटो – २० किलो
  • शिमला मिर्ची – ४० किलो
  • फ्लॉवर (फुलकोबी) – ३० नग
  • कोबी – २० नग
  • पपई – ४० किलो
  • कलिंगड – ३० नग
  • बदाम आंबा – ५० किलो
  • झुकिनी – ३० किलो
  • रताळे – ४० किलो

आयोजन व सहकार्य:

या बाजाराचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या विशेष सहकार्याने करण्यात आले असून,
ऍड. अरविंदजी तायडे (पुणे शहर अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी) यांच्या पुढाकाराने हा उपक्रम साकारत आहे.

“शेतकरी ते थेट ग्राहक” हा उपक्रम केवळ परस्पर लाभदायक व्यवहारासाठी नसून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आणि ग्राहकांना दर्जेदार व ताजे अन्नधान्य उपलब्ध करून देणारा एक आदर्श उपक्रम ठरणार आहे.

शहरातील नागरिकांनी या बाजाराला भेट देऊन स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.