पुणे, : अस्थिरोग चिकित्सेमध्ये उत्कृष्टतेचा वारसा असलेल्या संचेती ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सने सर्वांत अत्याधुनिक सुविधा असलेल्या संचेती ॲडव्हान्स्ड आर्थो केअर हॉस्पिटलची घोषणा केली आहे. 300 खाटांची अद्ययावत वैद्यकीय सुविधा पूर्णपणे कार्यान्वित असून स्मार्ट,ग्रीन,हायटेक (एसजीएच) पायाभूत सुविधांच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.संचेती हॉस्पिटलने नेहमीच अभिनव तंत्रज्ञान केंद्रस्थानी ठेवले असून आता डोझी ने विकसित केलेले एआय आधारित रिमोट मॉनिटरींग सिस्टिम (आरएमएस) आणि अर्ली वॉर्निंग सिस्टिम (ईडब्ल्यूएस) च्या साहाय्याने सुधारित रूग्ण सुरक्षेसाठी पुण्यातील पहिला स्मार्ट वॉर्ड उपक्रम सुरू केला आहे.
संचेती ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.पराग के.संचेती म्हणाले की,आरोग्यसेवा क्षेत्रात अग्रणी संस्था म्हणून आमची वचनबध्दता चिकित्सा पलीकडे जाऊन रूग्णसेवा नव्याने परिभाषित करणाऱ्या आधुनिकतेकडे जाण्याचा आमचा प्रयत्न असतो. डोझीची अद्ययावत मॉनिटरिंग सिस्टिम प्रस्थापित करणे हे हॉस्पिटलच्या आरोग्यसेवेमध्ये एक परिवर्तनीय पाऊल आहे.रूग्णांसाठी अधिक चांगले परिणाम मिळविण्यासाठी डाटाचलित तंत्रज्ञान,प्रतिक्रियात्मक वैद्यकीय सेवांपासून प्रतिबंधात्मक व सक्रीय आरोग्य सेवा प्रारूपाच्या दिशेने संचेती हॉस्पिटलची कटिबध्दता दर्शविते.या स्मार्ट वॉर्ड उपक्रमाअंतर्गत बिगर-आयसीयू बेडस या अत्याधुनिक रिमोट पेशंटस मॉनिटरींग सिस्टिम्सयुक्त होतील,ज्यामुळे महत्त्वाच्या वैद्यकीय निकषांवर देखरेख ठेऊन गरज पडल्यास योग्य वैद्यकीय सेवा देता येतील.या अत्याधुनिक उपायांचा अवलंब सर्व्हिंग पेशंटस् इज सर्व्हिंग गॉड या तत्त्वाशी सुसंगत असून संचेतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.के.एच.संचेती यांची वचनबध्दता आहे.
डोझीच्या साहाय्याने आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना हृदयाचे ठोके,रक्तदाब,एसपीओ2 पातळी,तापमान आणि ईसीजी यांसारख्या महत्त्वाच्या वैद्यकीय बाबींवर दुरस्तपणे देखरेख ठेवता येईल.डोझीच्या अर्ली वॉर्निंग सिस्टिम (ईडब्ल्यूएस)च्या सहाय्याने या महत्त्वाच्या बाबींचे कल लक्षात घेऊन मागोवा ठेवतो येतो आणि रूग्णाच्या वैद्यकीय परिस्थितीत बिघाड झाल्यास आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना सूचना मिळून योग्य वेळेत गरजेनुसार हस्तक्षेप करता येतो.डोझी तर्फे एआय आधारित बॅलिस्टोकार्डिओग्राफी (बीसीजी) चा वापर केला जातो,ज्यामुळे कॉन्टॅक्टलेस मॉनिटरींग शक्य होते.डोझीच्या तंत्रज्ञानाला पेटंट प्राप्त झाले असून हे तंत्रज्ञान भारतात विकसित केले गेले आहे.या अभिनव तंत्रज्ञानाचा रूग्ण सुरक्षिततेवर,वैद्यकीय परिणामांवर आणि कामकाजाच्या कार्यक्षमतेवर लक्षणीय सकारात्मक प्रभाव पडतो.
संचेती समुहाचा रूग्णकेंद्रित दृष्टीकोन आणि स्मार्ट आणि शाश्वत आरोग्य सेवेसाठी कटिबध्दता ही अद्ययावत रूग्णसुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याच्या डोझीच्या ध्येयाशी सुसंगत आहे. या धोरणात्मक एकीकरणामुळे सतत देखरेख आणि योग्य वेळेत उपचार हे एक मानक प्रस्थापित होईल,ज्यामुळे परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होतील,असे मत डोझीचे भारतातील प्रमुख कौशल पांड्या यांनी सांगितले.
संचेती ग्रुप हे नैतिक पध्दती आणि विश्वासार्हता यासाठी ओळखले जाते आणि यामुळेच जागतिक दर्जाच्या आर्थोपेडिक सेवांमध्ये अग्रस्थानी आहे.डोझीच्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे या वचनबध्दतेला आणखी बळ मिळणार असून संचेतीचे स्थान रूग्ण व आरोग्य सेवा प्रदात्यांसाठी शाश्वत व अभिनव पध्दतींचे ठिकाण म्हणून अधिक दृढ झाले आहे.