Spread the love

६० व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य धम्म कार्यक्रम संपन्न

पुणे – भारतीय बुद्ध सासन सभेच्या वतीने, संस्थेचा ६० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व धार्मिकतेने बुद्धभूषण मंडळ, महात्मा फुले हॉल, आंबेडकर चौक, बोपोडी, पुणे-२० येथे साजरा करण्यात आला.

या विशेष धम्म समारंभाचे अध्यक्षस्थान मा. सुरेश भाऊ रोकडे (पुणे शहर जिल्हाध्यक्ष, भा.बु.सा.सभा) यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. भिमराव सोनवणे (पक्ष व धम्म संघटन प्रमुख, पुणे) यांनी केले.

प्रमुख वक्त्यांमध्ये

मा. अॅड. एल. टी. सावंत (माजी आमदार)

मा. एच. बी. जाधव (केंद्रीय सचिव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)

मा. प्रा. के. व्ही. सोनकांबळे (वरिष्ठ धम्म मार्गदर्शक)

मा. आनंद सदानंद कांबळे (पुणे शहर जिल्हाध्यक्ष, रि.पार्टी ऑफ इंडिया – कांबळे)
यांनी उपस्थितांना संबोधित करत बौद्ध संस्कृतीचे व संरक्षणाचे महत्व विशद केले.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये
मा. वैशालीताई गायकवाड, जालिंदर पटेकर, गौतम ओव्हाळ, नंदाताई यादव, हिराबाई कांबळे, अॅड. वर्षा अरुण कांबळे, जगन्नाथ गायकवाड, शशिकांत ओव्हाळ, मंदा भालेराव, सागर वानखडे, मुकेश यादव, साहेबराव जानराव, गणेश धायमुक्ते, जीवन सोनवणे, अर्जुन कांबळे, प्रज्योत एच. इत्यादींचा समावेश होता.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजय कांबळे, फुलचंद कांबळे, विनोद यादव, प्रकाश गायकवाड, गोविंद कांबळे, नितीन गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, राजन कांबळे, बाळासाहेब घिवार, विनोद माने आणि संपूर्ण कार्यकारिणीने परिश्रम घेतले.

कार्यकारिणी पदाधिकारी:

मा. सुरेश भाऊ रोकडे (अध्यक्ष)

मा. प्रदीप लोखंडे (सरचिटणीस)

मा. मालनताई सुरेश गायकवाड (कार्याध्यक्ष)

धम्मकार्य व सामाजिक समतेच्या विचारांची नवी ऊर्जा देणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

नितीन मरपाळे (अध्यक्ष राष्ट्रवादी कॉ. बापोडी), सुरेश पवार (अध्यक्ष आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव बापोडी), दादा भोसले (अंकुशराव साठे अध्यक्ष अखिल मातंग युवक संस्था) आदी उपस्थित होते