Spread the love

बाणेर :

बाणेर, बालेवाडी, सुस, महाळूंगे परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातुन शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आपल्या परिसरातील उत्तर भारतीय नागरिकांच्यासाठी बाणेर येथे छठ पूजेचे आयोजन करण्यात आले होते.

गुरुवारी मावळत्या सूर्याला अर्घ्य वाहून शुक्रवारी उगवत्या सूर्याला नमन करून हजारोंच्या उपस्थितीत छटपूजेचा सोहळा रंगला होता. यावेळी उत्तर भारतीय नागरिकांनी धार्मिक परंपरेनुसार पूजा केली. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वर्मा हे निमंत्रक होते.

बाणेर, बालेवाडी, सुस, महाळूंगे परिसरात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय नागरिक वास्तव्यास असून त्यांचा छठ पुजा हा फार मोठा कार्यक्रम साजरा करता यावा म्हणून खास छठ पुजा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या पुढे देखील उत्तर प्रदेश मधील हिंदू सण समारंभ उत्साहात साजरे करण्यासाठी प्रयत्न करत राहू.
– डॉ. दिलीप मुरकुटे पाटील
शिवसैनिक

यावेळी नामदार कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, शिवसेना (ऊबाटा) निरीक्षक दिलीप दगडे, बाळासाहेब भांडे(सदस्य ल. व. समिती), मंजु वर्मा, जयेश मुरकुटे, अतूल अवचट, सतीश मराठे, रखमाजी पाडाळे, हिरामण पाडाळे, शाम बालवडकर, हिरामण तापकीर, संतोष भोसले, विकास भेगडे, ॲड. विशाल पवार, ओम बांगर, ॲड. सुदाम मुरकुटे, कृष्णा चांदेरे, बेलाल आलम, काशिनाथ वर्मा, ओमप्रकाश वर्मा, मिना वर्मा, शिलपी वर्मा, चंदन वर्मा, जय सहा, किरण वर्मा, घनश्याम वर्मा, अजय वर्मा, जियुत प्रजापती, प्रमोद प्रजापती, प्रमोद भगत, अविनाश गायकवाड, सुभाष सहानी आणि उत्तर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.