बोपखेल
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर
यांच्या आजच्या बोपखेल दौऱ्याला उदंड प्रतिसाद मिळाला. तुतारीचा नाद संपूर्ण परिसरात घुमत होता.तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला यांनी अक्षरशः परिसर घोषणांनी दणाणून सोडला, घराघरांतून नागरिक बाहेर येऊन रॅली ला उत्तम प्रतिसाद देताना दिसत होते.
ज्येष्ठ नागरिकांनी संवाद बैठक घेऊन आम्ही सर्वतोपरी डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांच्या सोबत असून त्यांनाच बहुमताने विजयी करू असे एकमताने ठरवून निवडणुकी पूर्वीच विजयी जल्लोष साजरा केला.
महिलांनी देखील पारंपरिक पद्धतीने ओवाळणी करून डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांचे स्वागत केले तसेच आम्हीं संपूर्ण महिला शक्ती आपल्या सोबत राहून परिवर्तन घडवून आणल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त करून सोबत असल्याचे आश्वासन दिले.
तरुणांनी तर संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता, हात उंचावून विजयी मुद्रा करून रॅली ला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विजय खेचून आणू असे ठणकावून सांगितले.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांच्या सोबत संपूर्ण रॅली मध्ये फिरून मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मतदान करून तुतारी वाजवणारा
माणूस या चिन्हासमोरील बटण दाबून डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांना विजयी करा असे आवाहन केले.
यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि बोपखेलवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच हरिओम ज्येष्ठ नागरिक संघ, जय जगदीश संघ, प्रतीक्षा घुले, कोवे सर यांसह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितलं.