पुणे:- ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व भीमथडी फाउंडेशन आयोजित 18 व्या भीमथडीला काल सुरुवात झाली.
भीमथडी असलेल्या विविध दालनातील सिलेक्ट दालनात विविध 13 राज्यांमधील 31 स्टॉल असून त्यामध्ये महिला बचत गटाच्या व त्या ठिकाणची संस्कृती जपणाऱ्या विविध वस्तू पुणेकरांना आकर्षून घेताना दिसत होत्या. राजस्थान, आसाम, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, बिहार व काश्मीर आदी 13 राज्यातील, हस्तकलेच्या माध्यमातून बनविलेल्या विविध उपयोगी वस्तुंना पुणेकरांनी पसंती दिली. त्यामध्ये बांबू काम, ज्वेलरी, खणकाम , टाकाऊ प्लास्टिक मटेरियल पासून बनविलेल्या बॅगा, एम्ब्रॉयडरी, बांबूच्या फ्याब्रिक पासून बाळाचा दुपट्टा, वेस्ट बंगालचा हॅन्डमेड कांता स्टिच , सिल्क कॉटन फ्राब्रिक, फेमस हँडलूमस, राजस्थानी पारंपरिक पेंटिंग, असामची ग्लास बेस ज्वेलरी, तेलंगणाच्या एकत कॉटनचे विविध प्रकार , राजस्थानचे मलमल कॉटन वर्क, दिल्लीचे हॅन्ड ब्लॉक नॅचरल डाय, इत्यादी. विविध प्रकारच्या कलाकारी भीमथडी सिलेक्ट मध्ये पहावयास मिळत आहेत.
भीमथडीतील पर्यावरण पूरक देवराई घेते पुणेकरांचे लक्ष वेधून
भीमथडीत देवराईमध्ये सुमारे 120 प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड केली आहे. देवराईमुळे देशी वृक्षांचे मुबलक बीज तयार होते. देवराई मुळे गावागावात देवराई तयार झाल्यास ऑक्सिजन बँक, निसर्गातील विविध परीसंस्थाना संरक्षण, निसर्गाचा समतोल, किडे मुंग्या यांना आश्रय व खाद्य, शेती उत्पनात वाढ असे विविधांगी फायदे त्याच गावाला मिळतात.
दरम्यान आज भीमथडीच्या दुसऱ्या दिवशी कार्यसम्राट आमदार मा रोहित दादा पवार , सकाळ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मा. प्रतापराव पवार यांनी आज भीमथडीला भेट देऊन विविध स्टॉलची पाहणी केली. तसेच
पुणे व परिसरातील विविध शाळा व व्यवस्थानशास्त्र शिकणारे विद्यार्थी आदींनी भीमथडीला भेटी देऊन विपणन कलेची माहिती घेतली.
अप्पासाहेब पवार दालन :- डॉ अप्पासाहेब पवार यांच्या 25 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना आदरांजली म्हणून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान व जोडधंदे या ठिकाणी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये ठिबक , तुषार व सूक्ष्म सिंचन प्रणाली, बहुउद्देशीय टोकन यंत्र, कुकुट व शेळी मेंढी पालन उद्योग आदी शेती पूरक व्यावसाय दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
भीमथडीत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित यांचे स्टॉलमध्ये महाराष्ट्रातील आदिवासींच्या शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट, आदिवासींच्या सहकारी संस्था आदींच्या माध्यमातून बनवलेल्या विविध वस्तू शबरी नॅचरलस नावाने विक्रीस मांडल्या आहेत. या मधे आवळा कॅन्डी, मोह फुलाचा मध, तेल, मोहाचा मनुका, मोहाची वाईन, मोहाचे चॉकलेट, बिस्किट्स, मोहाचा साबण यासह आदिवासी भागातील भरड धान्य, तांदूळ, बांबूचे गिफ्ट बास्केट व बांबूपासून बनविलेली लाईटची माळ इत्यादी नैसर्गिक वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत. याच बरोबर युनिव्हर्सल ट्राइब्स या आदिवासी भागातील स्टॉलच्या माध्यमातून आदिवासींनी बनवलेल्या विविध नैसगिर्क वस्तू- जसे की बांबूची पाणी बॉटल, बांबूचा कप आणि लाकडी वस्तूवर वारली पेंटिंग अशा विवध कलाकुसरीच्या वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत.
दिनांक 25 डिसेंबर पर्यंत सकाळी 10.00 ते सायंकाळी 10.00 वाजेपर्यंत चालणाऱ्या भीमथडी जत्रेला पुणेकरांनी आवर्जून भेट द्यावी असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात येत आहे.