पुणे,दि.१०: कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ हद्दीत समाविष्ट असणाऱ्या शासकीय व निमशासकीय तसेच केंद्रीय कार्यालयांमध्ये शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कडुन “माझे कार्यालय, जागरूक कार्यालय” या अभियानांतर्गत मतदान जनजागृती करत सुमारे १ हजार संकल्पपत्रांचे वाटप करण्यात आले. मतदानाच्या दिवशी विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी,कर्मचारी यांनीही मतदानाचा अनमोल हक्क बजवावा असे आवाहन स्वीप व्यवस्थापन कक्षाकडून करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचा जलसंधारण विभाग, लघू पाटबंधारे, आरोग्य विभाग, सहायक मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, मध्यवर्ती इमारत, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन संचालनालय, कृष्णा पाणी तंटा लवाद विशेष कक्ष, शिक्षण आयुक्त यांचे कार्यालय, संचालक, नगर रचना,सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था,सहायक संचालक, ग्रंथालय पुणे विभाग, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ पुणे, कृषी आयुक्तालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ, यांत्रिकी मंडळ जलसंपदा विभाग, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, महाराष्ट्र प्रादेशिक पर्यटन मंडळ, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक १ पुणे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग मध्य इमारत पुणे, उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग,पूर्व विभाग, मध्यवर्ती इमारत, मध्यवर्ती इमारतीतील शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये जाऊन स्वीप व्यवस्थापन कक्षामार्फ़त संकल्पपत्रांचे वाटप करणेत आले.