Spread the love

वडगांव शेरी, दि. १६: वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ५ लाख ३ हजार ५३९ इतकी मतदारसंख्या आहे, त्यापैकी १६ नोव्हेंबर अखेर ३ लाख ८४ हजार ९५० इतक्या मतदारांना मतदार माहिती चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहे. त्याचे प्रमाण ७६.४६ टक्के इतके आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घाटे यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्यावेळी मतदासंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना सुलभरित्या मतदान करता यावे, मतदान केंद्र व स्थळाची माहिती व्हावी एकूणच मतदानाचा टक्केवारीत वाढ होण्याच्यादृष्टीने मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात येत आहे, येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी जावून मतदान करावे, असे आवाहन श्री. घाटे यांनी केले आहे.