
पुणे (वारजे) : वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांपैकी एक आरोपीस पोलिसांनी रंगेहाथ पकडण्यात यश मिळवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन संशयित व्यक्ती वारजे परिसरात दरोड्याच्या उद्देशाने हालचाल करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे यांच्या तात्काळ एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. पोलिसांचे पथक पाहताच दोन्ही आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एकजण भिंतीवरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे यांनी दिली
वारजे परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात टोळीतील सोनू कपूर सिंग टाक या आरोपीला वारजे पोलिसांनी थरारत पकडले. ही संपूर्ण कारवाई सीसीटीव्हीत कैद झाली आहे.ही घटना आज पहाटे ३.५५ वाजता वारजेतील म्हाडा कॉलनीजवळ घडली. ‘टाक गँग’च्या सदस्यांनी धारदार शस्त्रांसह जीपने दरोड्याची योजना आखली होती. एका जागरूक नागरिकाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली. पाठलाग करून सोनू टाकला अटक करण्यात पोलिसांना यश आले, तर इतर दोघे फरार झाले.
https://youtu.be/wnLaQOicos8?si=qsdC4Y9qZwTL-thk
दरम्यान दुसरा आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी संशयितांकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे.
सोनूकडून २.५ किलो चांदीचे दागिने आणि धारदार हत्यारे जप्त करण्यात आले. त्याच्यावर पुणे, हडपसर, नेरूळ, सांगवी, चतु:शृंगी, देहूरोड आणि हिंजवडी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणी सोनू टाक, सचिन वाघमारे, सलीम, बाबा आणि त्यांच्या साथीदाराविरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
पुढील तपास सुरू असून, अधिकृत माहिती सायंकाळी जाहीर करण्यात येणार आहे, असे पोलीस निरीक्षक धेंडे यांनी सांगितले.