Spread the love

 

कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या शुक्रवार पेठ परिसरातील प्रचार फेरीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

रासने यांच्या प्रचारार्थ भाऊसाहेब रंगारी गणपती, जोगेश्वरी मंदीर, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, मेट्रो स्टेशन, आंग्रेवाडा, अकरा मारुती चौक, चिंचेची तालीम, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, सुभाषनगर, अत्रे सभागृह या परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते.
अशोक येनपुरे, रुपाली ठोफ्लबरे पाटील, स्वरदा बापट, उज्ज्वला गंजीवाले, दिलीप काळोखे, सोहम भोसले, दिलीप पवार, अनिल बेलकर, अशोक कदम, प्रणव गंजीवाले, शेखर बोफ्लडकर, पंकज मोने, नंदकुमार जाधव, अनिल पवार, मुकेश राजावत, विजय नाईक, अनिल तेलवडे, राजू ठिगळे, कल्याणी नाईक, अनिता वाघ, इंदिरा निगडे, मयुर गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

रासने म्हणाले, शहरातील मध्यवस्तीतील समांतर असलेले बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्ता हे रस्ते मध्य वस्तीतील सर्वात मोठ्या बाजारपेठेला जोडतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे रस्ते विस्तारलेले नाहीत. वाहनांची संख्या वाढल्याने या भागातील कोंडी प्रचंड वाढली आहे. अतिक्रमणे वाढत चालली आहेत. याच रस्त्याव असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या सौफ्लदर्याला बाधा येऊ लागली आहे. त्यामुळे हा रस्ता मॉडर्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

रासने पुढे म्हणाले. मध्य वस्ती ही शहराची मुख्य बाजारपेठ आहे. या मुळे हा परिसर सतत गजबजलेला असतो. त्यामुळे या रस्त्यावर अनेक वर्षांत नवीन ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन टाकता आलेली नव्हती. या वाहिन्या जुन्या आणि जीर्ण झाल्या होत्या. पुढील 20 ते 25 वर्षांचा विचार करून भूमिगत ड्रेनेज लाईन आणि जलवाहिन्या टाकण्यात आल्या. पुढील काळात प्रशस्त आणि देखणे पदपथही विकसित केले जाणार आहेत. रस्त्याच्या मधोमध रिफ्लेक्टर बसविण्यात येणार असून पथदिवे आकर्षक करण्यात येणार आहेत. हा रस्ता पुढील अनेक वर्षे पुन्हा करावा लागणार नाही. पादचारी, वाहनचालक सर्वांनाच त्याचा व्यवस्थित वापर करता येईल.