
पुणे | पुण्यासारख्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहरात एक गंभीर घटना घडली — अकोल्याहून बुद्धिबळ स्पर्धेसाठी आलेल्या युवकावर पहाटेच्या वेळी, सार्वजनिक ठिकाणी रॉडने हल्ला करून, त्याच्याकडील रक्कम जबरदस्तीने काढून घेण्यात आली. ही घटना **२५ जुलै रोजी, वाकडेवाडी बस स्थानक परिसरात** घडली.
बुद्धिबळ स्पर्धेसाठी अकोल्याहून पुण्यात आलेल्या युवकासाठी ही घटना केवळ शारीरिक वेदना नव्हे, तर एक मानसिक धक्का होता. शहरात परगावाहून आलेल्या नागरिकाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या घटनेमुळे परिसरात अस्वस्थता आणि भीती पसरली होती. या प्रकाराची माहिती मिळताच **खडकी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विक्रमसिंह कदम** यांनी तात्काळ विशेष तपास पथक नेमून सूचनांनुसार तपासाची सूत्रे **पो.उ.नि. श्री. दिग्विजय चौगले** यांच्या हाती सोपवली.
तपास अधिकाऱ्यांनी प्रथम घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक खबरदारी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे **सुधाकर राठोड व गालिब मुल्ला** यांना अवघ्या काही तासांतच संशयित आरोपीची ओळख पटविण्यात यश आले प्राप्त गोपनीय माहिती वरून — आरोपीचे नाव **अक्रम** असल्याचे निष्पन्न झाले.
सदर आरोपी **भवानी पेठ परिसरात** लपून बसलेला असल्याची माहिती मिळताच, तपास पथकाने वेषांतर करून परिसरात सापळा रचला आणि **त्याच्या राहत्या घरी छापा टाकून अटक केली.**
अटक केल्यानंतर आरोपीने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, अधिकाऱ्यांनी केलेल्या कौशल्यपूर्ण (पोलिसी खाक्या) चौकशीत त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. तपासात हेही निष्पन्न झाले की, आरोपी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने उद्दामपणे गुन्हा करत होता.
त्यामुळे **पो.उ.नि. दिग्विजय चौगले** व त्यांच्या पथकाने आरोपीचा उद्दामपणा मोडण्यासाठी **त्यास गुन्ह्याच्या ठिकाणी नेऊन ‘धिंड काढली’**. ही कारवाई करताना पोलिसांनी जनतेसमोर स्पष्टपणे दाखवले की **“कायद्याचे हात लांबचे असतात आणि कोणतीही उद्दामपणा खपवून घेतला जाणार नाही.”**
या यशस्वी कारवाईसाठी मा. व.पो. नि . विक्रमसिंह कदम साहेब यांचे मार्गदर्शन व सूचना करू. *पो.उ.नि. चौगले यांच्या नेतृत्वाखालील पथकात पो.ह. शशी सपकाळ, प्रताप केदारी, शशांक डोंगरे, दिनेश भोई, अनिकेत भोसले, ऋषिकेश दिघे, तसेच पो.कॉ. सुधाकर राठोड व गालिब मुल्ला** यांचा विशेष सहभाग होता.
आरोपीविरुद्ध **गु.र.नं. २२३/२०२५**, भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNS) कलम ३०९(६), ३११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास **न्यायालयीन कोठडीत रवानगी** करण्यात आली आहे.
ही घटना केवळ एक गुन्हा नव्हे, तर **सार्वजनिक शांतता, नागरिकांचा आत्मविश्वास आणि कायदा-सुव्यवस्थेच्या व्यवस्थेची कसोटी होती.** खडकी पोलिसांनी अत्यंत काटेकोर आणि वेळीच केलेल्या कारवाईमुळे, केवळ आरोपीस अटक केली नाही तर **नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास पुन्हा एकदा बळकट केला.**
—