Spread the love

जगद्गुरू संतस्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळयांचे बोपोडीत जल्लोषात स्वागत…


पुण्याचे प्रवेशद्वारअसलेल्या बोपोडी चौकात विविध पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्या वतीने पालखी सोहळ्याचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. तसेच सालाबाद प्रमाणे जेष्ठ नेते सुरेश पवार यांच्या नेतृत्वा खाली भोजनदान देऊन सेवा देण्यात आली. बेसन, भाकरी, खर्डा, कांदा, लाडू आणि जिलेबी चा आस्वाद सर्वांनी घेतला.
यामध्ये मातंगयुवक संघटनेचे अध्यक्ष अंकुशराव साठे, पत्रकार मंगेश गायकवाड, दादा भोसले, आशिष पवार, रफिक शेख, विजय अवचिंदे,कृणाल गायकवाड शाहरुख शेख, तसेच सौ.कौसल्या पवार, वंदना भोसले,शिवानी गायकवाड, वेदा वेल्हेकर, स्नेहा भोसले,वर्षा पवार अर्चना गायकवाड आदी सर्वांनी वारकऱ्यांना सेवा दिली. आणि दिंडी प्रमुखांना शाल श्रीफळ देऊन सत्कार सन्मान करुन आशीर्वाद घेतले.सोहळयांची नेत्रदीपक भव्यता डोळ्यात साठवून पुढील वर्षा साठी निरोप घेतला…