Spread the love

पुणे –पुणे पोलीस खात्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी, क्राईम, ए. टी. एस. व पोलीस उपनिरीक्षक श्री दिनेशभाऊ गडांकुश यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

न्यू बोपोडी सोशल कट्टा संस्थापक व अध्यक्ष श्री अंकुशराव साठे यांच्या वतीने हा कार्यक्रम ऍड. विठ्ठल आरुडे (नोटरी, भारत सरकार) यांच्या कार्यालयात पार पडला. यावेळी श्री अनिल पवार (माजी डी. वाय. एस. पी.), अंकुशराव साठे व ऍड. विठ्ठल आरुडे यांच्या हस्ते गडांकुश यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच वाढदिवसाचा केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमात वक्त्यांनी गडांकुश यांच्या कुटुंबाचा आणि त्यांच्या सामाजिक-राजकीय कार्याचा समाजात आदरपूर्वक प्रभाव असल्याचे विशेष अधोरेखित केले.

या प्रसंगी पुणे शहर महिला कॉ. सरचिटणीस सौ. शोभाताई आरुडे, श्री सुरेश पवार, नितीन मरापाळे (वार्ड अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), अन्वरभाई शेख (सामाजिक कार्यकर्ते), सुनील दोडके, करीमभाई तुर्क यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून दिल्या.