Spread the love

एखादी दुर्घटना घडते आणि ती विस्मरणातही जाते. पण प्रत्यक्ष पोळलेल्यांना दूरगामी परिणाम दीर्घकाळ भोगावे लागतात. त्या प्रश्नांचा सामना पुढील अनेक पिढ्यांनाही करावा लागतो. पानशेतचे धरण १९६१ मध्ये फुटले. पण ५० वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी त्यासंबंधीचे काही प्रश्न तसेच, अनुत्तरित राहिले होते.
पानशेतचा पूर, पूरग्रस्तांचं पुनर्वसन हे सगळं रीतसर सुरू होतं. पण पूरग्रस्तांच्या काही मागण्या, काही प्रश्न प्रलंबितच होते. पूरग्रस्त त्यासाठी सरकार दरबारी खेटे घालत होते. पण गुंता काही केल्या सुटत नव्हता. जमिनीचा मालकी हक्क, अनधिकृत खरेदी-विक्री व्यवहार, अतिक्रमणं नियमित करण्यासारखे अनेक मुद्दे प्रलंबित होते.
या प्रश्नांच्या संदर्भात पानशेत पूरग्रस्त समितीमार्फत चंद्रकांतदादा पाटील यांनी पाठपुरावा केला आणि पन्नासेक वर्षांपासून प्रलंबित असलेले पूरग्रस्तांचे अनेक प्रश्न धडाक्याने मार्गी लावले. पानशेत पूरग्रस्तांना दादांच्या रुपाने जणू देवदूतच भेटला…