
एमक्युर फार्मास्युटिकल प्रा्.लि.यांच्या सहकार्याने स्कुल बॅग व श्रीमती संगीता तिवारी यांच्या सहकार्याने गणवेश खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. कृष्णकुमार गोयल सर , एमक्युर एच आर डायरेक्ट कॅप्टन अंकुश पवार व श्रीमती संगीता तिवारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष अनिलजी मेहता सर ,सचिव आनंद छाजेड सर सहसचिव सुरजभान आगरवाल, सी. के. गोयल शालेय समितीचे अध्यक्ष मा.ॲड. अजय सूर्यवंशी सर, प्रमिलाताई मनोत बालमंदिरचे अध्यक्ष माननीय राजेंद्र भुतडा सर , ज्येष्ठ संचालक मा.सुधीर फेंगसे, कमलेशजी पंगुडवाले, डॉ. काशिनाथ देवधर, धीरज गुप्ता, पौर्णिमा लुणावत इ. उपस्थित होते .
याप्रसंगी श्रीमती संगीता तिवारी मॅडम यांनी इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 150 आयपॅड देण्याचे जाहीर केले .एम क्युअरचे एच. आर. कॅप्टन अंकुश पवार, मा. पौर्णिमा लुणावत, मा. गिरीश धनवट, मा. कौस्तुभ केंजळे व प्राचार्य, मुख्याध्यापक, उपप्राचार्य, विभाग प्रमुख, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष मा कृष्णकुमारजी गोयल यांनी विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणाऱ्या मदतीचा उपयोग करून शिक्षाणांत यशस्वी होण्यासाठी कष्ट करून मोठे व्हावे.असे सांगितले
तसेच यावेळी सी के गोयल ज्युनिअर कॉलेज चे माजी अध्यक्ष स्व नरेशजी गुप्ता यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मा धीरज गुप्ता यांच्या सहकार्याने फाईल वाटप करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.के. गोयल ज्यु.कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. शरदचंद्र बोटेकर सर यांनी केले. तर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका कांता गवळी मॅडम व आभार प्रदर्शन संचालक धीरज गुप्ता यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम सौ शुभांगी बरेल्लु, वंदना शिवशरण, जयश्री माकर मॅडम व हेमा आहेर यांनी केले.