
बोपोडी भाजी मंडईत घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्यास धोका
पुणे – बोपोडी भाजी मंडई येथील आवारात दिवसेंदिवस कचरा व घाणीचे साम्राज्य वाढत असून यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे. कचऱ्यामुळे डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याच दरम्यान बोपोडी भाजी मंडई परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असल्याने भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते. गर्दीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील घाणीमुळे नागरिकांना त्रास होत असून दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे.
याबाबत प्रभाग क्र. 11 चे अध्यक्ष ऍड. विठ्ठल आरुडे यांनी मनपा आरोग्य विभागाचे लक्ष वेधले असून तातडीने कचरा व घाणीचे साम्राज्य दूर करण्याची मागणी केली आहे.
➡️ नागरिकांच्या आरोग्यास धोका टाळण्यासाठी त्वरित साफसफाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.