Spread the love
महाशिवरात्री निमित्त ब्रह्माकुमारी तर्फे उभारली प्रतिकात्मक अमरनाथ गुफा
पुणे, : प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्‍वरीय विश्‍व विद्यालय बाणेर तर्फे महाशिवरात्री निमित्त  72 फूट लांब परमेश्‍वरास पत्र लिहून इंडिया स्टार बुक ऑफ रिकॉर्ड्स मध्ये विक्रम नोंदविला आहे. या पत्रात प्रत्येकाने आपल्याला महादेव शंकर भगवानाबद्दल वाटणार्‍या भावना लिहिल्या. तसेच ब्रह्माकुमारी तर्फे प्रतिकात्मक अमरनाथ गुफा उभारली होती जे मुख्य आकार्षण होते.
स्मार्ट युगात पत्रव्यवहार प्रथा लूप्त पावत आहे म्हणून ही प्रथा अविरत रहावी म्हणून सरळ महाशिवरात्री महादेवासच पत्र लिहिण्याचा उपक्रम प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्‍वरीय विश्‍व विद्यालयाने राबविला. याचा शुभारंभ  विठ्ठल भरेकर उप-शक्षण आधिकारी,  वैशाली जाधव (ढोलकीच्या तालावर विजेती), प्रिती शिरोडे, डॉ.त्रिवेणी बहिरट (संचालिका, प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्‍वरीय विश्‍व विद्यालय बाणेर), सोलोमन शेंडगे, संजय रायकर यांच्या उपस्थित करण्यात आला. तसेच घनशम रायकर, आमोल बालवडकर (मा.नगरसेवक),  दिलीप मुरकुटे यांनी या उपक्रमांस भेट दिली. तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्‍वरीय विश्‍व विद्यालय बाणेर येथे 10 फुट उंच आणि 20 फुट प्रतिकात्मक अमरनाथ गुफा उभारण्यात आली. या गुफेत शिवलिंग, शंकर भगवान आणि आकर्षक विद्यत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच सोमनाथ, महाकालेश्‍वर, केदारनाथ, भीमाशंकर, विश्‍वनाथ सह भारतात असलेले 12 ज्योतिर्लिंगाचे पोस्टर ही येथे  लावण्यात आलें होते. यावेळी येणार्‍या भक्ताला खोल आध्यात्मिक शांती आणि ध्यानाचा अनुभव ही दिला जात होता.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय बाणेर येथे महाशिवरात्री महोत्सव अंतर्गत बनविलेली गुफा पाहण्याची संधी  रायकर फार्म हाऊस, बाणेर, पुणे येथे सकाळी 8:00 ते रात्री 8:00 वाजेपर्यंत 28 फेब्रुवारी पर्यंत पाहण्यास उपलब्ध असणार आहे. याचा लाभ संर्वांनी घ्यावा असे आवाहन डॉ.त्रिवेणी बहिरट (संचालिका, प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्‍वरीय विश्‍व विद्यालय बाणेर) यांनी यावेळी केले.