
पुणे, — इंव्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रतिष्ठित ‘पर्यावरण पुरस्कार’ सोहळ्याचे १७वे संस्करण यशस्वीरित्या पार पडले. भारताच्या शाश्वत भविष्यासाठी झटणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार सोहळा २५ जुलै २०२५ रोजी पुण्यातील भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे आयोजित करण्यात आला.
यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये अग्रेसर ठरले आदि चोरडिया, पुण्याचे 19 वर्षीय पर्यावरणीय परिवर्तनकर्ता, ज्यांनी युवकांना हवामान कृती आणि पर्यावरणीय नवोपक्रमांकडे वळवण्यात नेतृत्वपर भूमिका बजावली आहे. आदि यांना ‘पर्यावरण गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हवामान बदल आणि शाश्वततेसाठी तरुणांना एकत्रित करण्याच्या त्यांच्या उल्लेखनीय नेतृत्वामुळे त्यांना गौरवण्यात आले. त्यांनी विद्यार्थी चालित अनेक हरित उपक्रम सुरू केले असून, सजग नवोपक्रमांचे समर्थक म्हणून स्थानिक कृती आणि डिजिटल जनजागृती यांचा यशस्वी संगम घडवला आहे. शाश्वतता आणि उद्योगधंद्याच्या परंपरेत वाढलेले असूनही, त्यांनी केवळ कौटुंबिक वारसा पुढे नेला नाही, तर हवामान शिक्षण व पर्यावरण-जागरूक उद्योजकतेच्या माध्यमातून त्याला नवे स्वरूप दिले आहे.
पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांना ‘पर्यावरण भूषण पुरस्कार’ आणि श्री गणपतराव पाटील यांना ‘पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार’ देऊन पर्यावरण शाश्वततेसाठी दिलेल्या त्यांच्या मोलाच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. याशिवाय, ८ इतर कर्तृत्ववान व्यक्तींनाही पर्यावरण क्षेत्रातील कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.
श्री सिद्धेश कदम, संचालक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि श्री रविंद्र मिरजे, उपसंचालक, विश्वेश्वर सहकारी बँक लि., पुणे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. श्री. सिद्धेश कदम म्हणाले, “आदिसारखे तरुण नेते केवळ पर्यावरण रक्षणामध्ये आपले योगदान देत नाहीत, तर संपूर्ण पिढीसाठी अर्थपूर्ण, भविष्यमुखी काम करण्याचा मार्गही तयार करत आहेत. उद्याचे युग हे अशा जोशपूर्ण बदल घडवणाऱ्या तरुणांंचेच आहे – जे कृती घडवतात, आशा पेरतात आणि समाजाला प्रेरणा देतात.”
PIC CAPTION :
1.Adi Chordia received the Paryawaran Gaurav Puraskar award at the17th edition of ‘Paryawaran Puraskars’, organised by The Environmental Club of India & Maharashtra Pollution Control Board (MPCB), in Pune recently.
The awards were presented by Shri Siddhesh Kadam, Director, Maharashtra Pollution Control Board & Ravindra Mirje, Deputy Director, Vishveshwar Sahakari Bank Ltd., Pune, in the presence of Padmashri Dr. G.D. Yadav.
2. Adi Chordia received the Paryawaran Gaurav Puraskar award with Padmashri Dr. G.D. Yadav who received the Paryawaran Bhushan Puraskar award
3. Adi Chordia