Spread the love

 

पुणे,: जिल्ह्यात ८८ लाख ४९ हजार ५८५ मतदार असून त्यापैकी ४५ लाख ७९ हजार २१६ पुरुष तर ४२ लाख ६९ हजार ५६९ महिला मतदार आहेत. जिल्ह्यात सरासरी ९०.९५ टक्के मतदार ओळख चिठ्ठ्यांचे वितरण पूर्ण झाले असून आजअखेर मतदार चिठ्ठीवाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली.

जिल्ह्यातील सर्वाधिक ६ लाख ६३ हजार ६२२ मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी २ लाख ८३ हजार ६३५ इतके कसबा पेठ मतदार संघात आहेत. जुन्नर मतदार संघात ३ लाख २५ हजार ७६४, आंबेगाव मतदार संघात ३ लाख १४ हजार २५२, खेड आळंदी ३ लाख ७६ हजार ६२३, शिरूर ४ लाख ६६ हजार ४२, दौंड ३ लाख १९ हजार ३११, इंदापूर ३ लाख ४१ हजार ४८५, बारामती ३ लाख ८० हजार ६०८, पुरंदर ४ हजार ६४ हजार १७, भोर ४ लाख २० हजार २७८, मावळ ३ लाख ८६ हजार १६७, पिंपरी ३ लाख ९१ हजार ६०७, भोसरी ६ लाख ८ हजार ४२५, वडगाव शेरी ५ लाख ३ हजार ५३९, शिवाजीनगर २ लाख ९५ हजार ११७, कोथरूड ४ हजार ४० हजार ५५७, खडकवासला ५ लाख ७६ हजार ५०५, पर्वती ३ लाख ६० हजार ९७४, हडपसर ६ लाख २५ हजार ६७५, पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात २ लाख ९५ हजार ३८२ मतदार आहेत.

मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्र सज्ज
जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात ८ हजार ४६२ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यापैकी ६ हजार ५९४ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध आहे. ६० गृहनिर्माण संस्थांमध्ये १२६ मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. २६७ मतदान केंद्र झोपडपट्टी भागात आहेत. जिल्ह्यात प्रत्येकी २१ मॉडेल, युनिक, महिला संचलित, दिव्यांग संचलित, युवा संचलित तर ९६ परदानशीन मतदान केंद्र असून १ हजार ५०० मतदान केंद्रावर पाळणाघरांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इंदापूर भोर मावळ व शिवाजीनगर हे मतदान केंद्र संवेदनशील मतदान केंद्र आहेत.

जिल्ह्यात मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत २१ विधानसभा मतदार संघात वितरणासाठी प्राप्त झालेल्या २९ लाख ३८ हजार मतदार मार्गदर्शिकांपैकी ९३ टक्के म्हणजे २७ लाख ३६ हजार ८६३ मतदार मार्गदर्शिकांचे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत वितरण करण्यात आले आहे.