Spread the love

पुणे, : खडकी परिसरात दुपारी झालेल्या जबरी चोरीच्या प्रकरणात अवघ्या 06 तासांत आरोपीला अटक करण्यात खडकी पोलिसांना यश आले आहे. ही धडाकेबाज कारवाई खडकी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.

 घटनेचा तपशील:

🗓️ घटना दिनांक: 24 जून 2025
🕐 वेळ: दुपारी 12:30 वाजता
📍 ठिकाण: खडकी रेल्वे स्टेशन समोर, जुना पुणे-मुंबई महामार्ग, पुणे

गुन्ह्याची पार्श्वभूमी:
दिनांक 24 जून 2025 रोजी फिर्यादी हे जुना पुणे मुबई हायवेवरुन जात असताना एका अज्ञात इसमाने त्यांची गाडीच्या आडवी गाडी मारुन फिर्यादी यास धारधार शश्त्राचा धाक दाखवुन फिर्यादी यांचे कानातील सोन्याची बाली हिसकावून जबरीने चोरी केली. सदर घटना ही वर्दळीच्या हमरस्त्यावर घडल्यामुळे ती गंभीर स्वरूपाची असल्याने खडकी पोलीसांनी लागलीच गुन्हा दाखल करुन आरोपी शोध मोहिम चालू केली.

पोलीस तपास आणि कारवाई:
घटनेची माहिती मिळताच मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिपील फुलपगारे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकाला तात्काळ निर्देश दिले.

पोलीस उपनिरीक्षक श्री. दिग्विजय चौगले यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट दिली. फिर्यादीकडून मिळालेली माहिती व CCTV फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपास पथकाने बोपोडी चौक येथे उभा असलेला एक संशयित इसम ताब्यात घेतला. त्याला चौकशीत प्रथमतः उडवा उडवीची उत्तरे दिली नंतर पोलीसी खाक्या दाखविताच गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपीत याचे नाव मुस्तफा उर्फ मुसा शरिफ कुरेशी (वय 20 वर्षे) असल्याचे निष्पन्न झाले. तो पूर्वीचा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही गुन्ह्यांची नोंद आहे.

👤 अटक केलेला आरोपी:

  • नाव: मुस्तफा उर्फ मुसा शरिफ कुरेशी

  • वय: 20 वर्षे

  • पार्श्वभूमी: रेकॉर्डवरील गुन्हेगार, यापूर्वीही अनेक चोरी व गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग.

सदर आरोपीस पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले व त्याचे पथकाने अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

पुणे शहर पोलीस विभाग नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने गस्त, निरीक्षण व तांत्रिक साधनांचा वापर करून कार्यवाही करत आहे.