Spread the love
पुणे :शालेय वयात असणारी गणिताची भीती कमी करून अवघड वाटणाऱ्या या विषयाशी मैत्री करण्यात मदत करणारी “अंकनाद – गणिताची सात्मिकरण प्रणाली” ही इंडिविश वेलफेअर फाऊंडेशन मुंबई च्या माध्यमातून पुण्यातील प्रथितयश शिक्षण संस्थेतील १२७५० विद्यार्थ्यांकरिता देण्यात येणार आहे. मॅप एपिक कम्युनिकेशन्स  प्रा. लि., पुणे निर्मित अंकनाद –गणिताची सात्मिकरण प्रणालीचे वितरण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या  पुण्यतिथिदिनी, दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी बारा वाजता करण्यात येणार आहे.यासंबंधीचा प्रातिनिधिक कार्यक्रम भावे हायस्कूल(सदाशिव पेठ) येथे  होणार आहे.यावेळी महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबा शिंदे,मॅप एपिक कम्युनिकेशन्स  प्रा. लि चे संचालक मंदार नामजोशी,निर्मिती नामजोशी,पराग गाडगीळ तसेच इंडिविश वेलफेअर फाऊंडेशन चे अधिकारी   उपस्थित राहणार आहेत.इंडिविश वेलफेअर फाऊंडेशन च्या वतीने पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. 
इंडिविश वेलफेअर फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था गणिताच्या मूलभूत गोष्टी रुजवण्यात प्रयत्नशील आहे. पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळी, डेक्कन एज्यूकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटी आणि महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मिळून एकूण ८७ विद्यालयातील २५५ वर्गात ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे.प्रत्येकी ५० विद्यार्थ्यांमध्ये मिळून एक,याप्रमाणे  या प्रणालीचे एक उपकरण (एम पी ३ डिवाइस) देण्यात येणार आहे. 
अनेक सर्वेक्षणातून असे निदर्शनात आले आहे की, ९०% विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती असते. ही भीती कमी करण्यात व गणीताशी मैत्री करण्यात, “अंकनाद – गणिताची सात्मिकरण प्रणाली” उपयुक्त आहे. सदर प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगीतबद्ध पूर्णांक,अपूर्णांकांचे व वर्गांचे पाढे आत्मसात करणे सोपे  होईल आणि गणीता शी त्यांची मैत्री होईल. गणित, सर्व विषयांची जननी आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांची गणीतशी मैत्री होणे जरुरीचे आहे. म्हणूनच, इंडिविश वेलफेअर फाऊंडेशन ही स्वयंमसेवी संस्था गणिताच्यामूलभूत गोष्टी रुजवण्यात प्रयत्नशील आहे.
 “अंकनाद– गणिताची सात्मिकरण प्रणाली” तीन टप्प्यात विभागली आहे.पहिल्या टप्प्यात  श्रवणसंस्कारातून पूर्णांक, अपूर्णांकांचे व वर्गांचे आत्मसात करणे, द्वितीय टप्प्यात मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासनच्या संयुक्त विद्यमाने पाढे  सात्मिकरण   स्पर्धा आणि तिसऱ्या टप्प्यात  गणीतालय‘ पोर्टल चे सभासद होणे. या पोर्टल वर विद्यार्थ्यां करिता गणीतीय संकल्पनावरचे १२०० हून  अधिक व्हीडियो, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारखे १००० हून  अधिक मार्गदर्शक उपलब्ध आहेत. तसेच गणित विषयाचा इतर विषयांशी संबंध अधोरेखित करणारे असंख्य वेबिनार  उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचार शक्तीस यामुळे चालना मिळेल आणि त्यांचा उजवा मेंदू कार्यान्वित होण्यास मदत होईल. ह्या प्रणाली मुळे विद्यार्थ्यांचा  सर्वांगीण विकास होईल, यात शंकाच नाही,असे मंदार नामजोशी यांनी या पत्रकात म्हटले आहे. 
………………………………………………