Spread the love

मोहित कंबोज भारतीय फाउंडेशनने ३० दिवसांच्या श्रावण यात्रेदरम्यान सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि दर्शन सहजसाध्‍य करण्यासाठी आगळ्यावेगळ्या गर्दी व्यवस्थापन पायलट प्रकल्पाची सुरुवात केली आहे, यशस्‍वी ठरल्‍यास हा प्रकल्‍प मोठ्या प्रमाणात स्‍वीकारला जाण्‍याची शक्‍यता आहे.

भीमाशंकर, भारतातील प्रमुख तीर्थस्थळांवर विशेषतः श्रावणासारख्या सणासुदीच्या महिन्यांत भाविक मोठ्या संख्‍येने येतात, परिणामत: गर्दी वाढते. ज्यामुळे सुरक्षितता, गर्दी नियंत्रण आणि एकूण तीर्थयात्रेच्या अनुभवाबाबत चिंता निर्माण होते. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून पूजनीय असलेले भीमाशंकर मंदिर येथे भाविक मोठ्या प्रमाणात येतात. मर्यादित प्रवेश असलेल्या डोंगराळ प्रदेशात वसलेले हे मंदिर श्रावणात लाखो भाविकांचे लक्ष वेधून घेते, ज्यामुळे अनेकदा लांब रांगा आणि गर्दी पाहायला मिळते.

या दीर्घकालीन आव्हानाला तोंड देण्यासाठी मोहित कंबोज भारतीय फाउंडेशनने केअरटेनसोबत सहयोगाने भीमाशंकर मंदिरात संरचित, समुदाय-संचालित अतिरिक्‍त गर्दी व्यवस्थापन यंत्रणा सुरू केली आहे. हा उपक्रम सुरक्षितता वाढवण्यासाठी, यात्रेकरूंच्या हालचाली सुलभ करण्यासाठी आणि सहजपणे दर्शन अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. या उपक्रमाला भीमाशंकर मंदिर ट्रस्टचे पाठबळ आहे. हा उपक्रम मोठ्या प्रमाणात भाविक येणाऱ्या तीर्थस्थळांवर गर्दी व्यवस्थापन पद्धतींचे आधुनिकीकरण आणि सुव्यवस्थित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

या उपक्रमाचे वेगळेपण त्याच्या प्रबळ समुदाय-संचालित मॉडेलमधून दिसून येते. जवळच्या गावांमधील स्थानिक तरुणांना गर्दी व्यवस्थापन, प्रथमोपचार, संवाद आणि आपत्कालीन प्रतिसादाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. केअरटेनच्या तज्ञांच्या पाठिंब्यासह मोहित कंबोज भारतीय फाउंडेशनने वैज्ञानिक बॅरिकेडिंग, रांगांचे योग्‍य व्‍यवस्‍थापन, सीसीटीव्ही देखरेख आणि वॉकी-टॉकीसह सहज ओळखता येणाऱ्या पोशाखात प्रशिक्षित स्वयंसेवकांसह सर्वांगीण यंत्रणा लागू केली आहे. या ठिकाणी व्हीआयपी प्रवेश, शौचालये आणि प्रथमोपचारासाठी स्पष्टपणे चिन्हांकित केलेले झोन देखील आहेत.

मंदिर प्रशासनासोबत समन्‍वय साधत सतत १५ दिवस सार्वजनिक घोषणा करण्‍यात येतील, ज्‍यामुळे यात्रेकरूंना प्रवेश व निर्गमन द्वार (मंदिरामधून बाहेर पडण्‍याचा मार्ग), पाणी व शौचालय सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा आणि व्हीआयपी मार्गांबद्दल मार्गदर्शन केले जाईल, ज्‍यामधून पारदर्शकता आणि सुलभ हालचालीची खात्री मिळेल. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका आणि ऑन-ग्राउंड कर्मचारी तैनात आहेत, तर केअरटेन कर्मचारी स्थानिक पोलिसांसोबत सहयोगाने पार्किंग आणि वाहतूक व्यवस्था व्यवस्थापित करत आहेत. ही यंत्रणा मंदिराच्या विधी किंवा पावित्र्याला अडथळा न आणता सुरक्षिततेची खात्री देते.

फाऊंडेशनचे संस्‍थापक श्री. मोहित कंबोज भारतीय म्‍हणाले, ”हे फक्‍त गर्दीवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी नाही. यामधून वृद्ध असो किंवा तरूण प्रत्‍येक भक्‍ताला सुरक्षित, आदरणीय व आध्‍यात्मिकरित्‍या समाधनकारक अनुभव मिळण्‍याची खात्री घेतली जाते. आजच्या काळात, धार्मिक स्थळांवर गर्दी व्यवस्थापन हा पर्याय नसून जबाबदारी आहे. इतक्या मोठ्या मेळाव्यांसह आपल्याला जीवनाचे रक्षण करण्‍यासोबत पावित्र्य जपणाऱ्या यंत्रणांची गरज आहे.”

भीमाशंकर क्षेत्र मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे म्हणाले, ”पवित्र श्रावण महिन्यात येणाऱ्या भाविकांचे व्यवस्थापन करणे हे आमच्यासाठी नेहमीच आव्हान राहिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला अशा संरचित गर्दी व्यवस्थापन व्यवस्थेची आवश्यकता भासत आहे, जी यात्रेची सुरक्षितता आणि पावित्र्य दोन्ही जपू शकेल. मोहित कंबोज भारतीय फाउंडेशनने संसाधनांसह सखोल विचारशील, समुदाय-केंद्रित दृष्टिकोनातून पुढाकार घेतल्‍याबद्दल आम्ही त्यांचे खरोखर आभारी आहोत. त्यांच्या सहभागामुळे अत्यंत आवश्यक असलेली शिस्त, पायाभूत सुविधा आणि स्वयंसेवकांना प्रशिक्षण मिळाले आहे, ज्यामुळे आम्हाला आमच्या जुन्या परंपरा आणि विधींशी तडजोड न करता भाविकांना सुरक्षित, विनासायास व आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध दर्शन अनुभव देता आला आहे.”

दरवर्षी कुटुंबं, ज्येष्ठ नागरिक आणि आध्यात्मिक साधक यांच्‍यासह लाखो यात्रेकरू भीमाशंकर मंदिरामध्‍ये दर्शनासाठी उंच आणि अरुंद डोंगराळ मार्गांवरून जातात. श्रावणासारख्या गर्दीच्या काळात अशा परिस्थितीमुळे गर्दी आणि एकूण सुरक्षिततेशी संबंधित आव्हाने निर्माण होऊ शकतात. भारतातील अनेक मंदिरांना अशाच प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते, पण भीमाशंकर येथे अतिरिक्‍त गर्दी व्यवस्थापन यंत्रणा अगदी योग्‍य वेळी सुरू करण्‍यात आली आहे आणि ते आवश्‍यक देखील होते. यशस्‍वी ठरल्‍यास हे मॉडेल इतर तीर्थस्थळांवर देखील मोठ्या प्रमाणात अवलंबण्‍यात येईल, ज्‍यामुळे सुरक्षिततेसाठी आणि सहजसाध्‍य दर्शन अनुभवासाठी नवीन मापदंड स्‍थापित होईल.

मोहित कंबोज भारतीय फाउंडेशनचा मंदिरांचे संवर्धन, ट्रान्सजेंडर समुदायाची उन्‍नती, बेवारस व्‍यक्‍तींचे आदरणीय अंत्यसंस्कार, समुदाय कल्याण आणि आता आध्यात्मिक पायाभूत सुविधांमध्ये प्रभावी प्रकल्प राबवण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे सुरक्षित, अधिक सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यात त्यांची भूमिका आणखी पक्‍की होईल.

मोहित कंबोज भारतीय फाऊंडेशन बाबत:

१० मे २०१९ रोजी परोपकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोहित कंबोज भारतीय यांनी स्थापन केलेली मोहित कंबोज भारतीय फाउंडेशन (एमकेबीएफ) संपूर्ण भारतात कायमस्वरूपी सामाजिक प्रभाव निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. भारतीयत्‍वाच्या भावनेने प्रेरित होऊन फाउंडेशन समानता, प्रतिष्ठा आणि एकतेला प्रोत्साहन देते, तसेच ट्रान्सजेंडर समुदायाला सक्षम करते, बेवारस मृत व्यक्‍तींचे आदरपूर्वक अंत्यसंस्कार करते आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मंदिरांचे संवर्धन करते, समावेशन आणि अभिमान वाढवून वारसा जपते.

नुकतेच, फाउंडेशनने धार्मिक उत्सवांदरम्यान सुव्यवस्थितपणे गर्दीचे व्‍यवस्‍थापन करण्‍याची गरज लक्षात घेतली. भीमाशंकर मंदिराच्या ३० दिवसांच्या श्रावण यात्रेत लाखो भाविकांना सुरक्षित, निर्मळ आणि आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण अनुभव मिळावा यासाठी समुदायाच्या नेतृत्वाखालील उपक्रम सुरू केला.