कसबा मतदारसंघात आज महायुतीचा विजयसंकल्प मेळावा मोठ्या उत्सहात संपन्न झाला. कसबा मतदारसंघात महायुतीच्या विजयासाठी आणि राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्याचा निर्धार करण्यात आला. महायुतीतील सर्वांची वज्रमूठ करत जोमाने काम करण्याचा संकल्प मेळाव्यात करण्यात आला.
यावेळी बोलताना धीरज घाटे म्हणाले, कसबा मतदारसंघात एकवटलेली महायुतीची ताकद बघितल्यानंतर आपले उमेदवार हेमंत रासने विजयी होणार हे निश्चित झालं आहे. लोकसभेच्या मताधिक्यापेक्षा अधिकचा लीड मिळेल. राज्यामध्ये लोककल्याणकारी महायुतीचे सरकार आणण्यासाठी जनता कसब्यातील आमदार विधानभवनात पाठवेल हा विश्वास आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले, हेमंत रासने हे अत्यंत शांत आणि संयमी असून त्यांनी गेल्या 18 महिन्यांमध्ये केलेलं काम कौतुकास्पद आहे. पराभव झाल्यानंतर अनेक जण खचून जातात मात्र त्यांनी दुप्पट गतीने नागरिकांची सेवा केली. त्यामुळे कसब्यातील जनता त्यांना नक्की आशीर्वाद देऊन विधानसभेत पाठवेल हा विश्वास आहे.
या पदाधिकारी मेळाव्यास भाजप माजी राष्ट्रीय महामंत्री श्री. सी.टी. रवीजी, भारतीय जनता पार्टी पुणे शहराध्यक्ष श्री धीरज घाटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष श्री. दीपकभाऊ मानकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अध्यक्ष श्री.संजय सोनावणे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख महिला आघाडी सुदर्शनाताई त्रिगुनाईत, शिवसेना प्रदेश सचिव श्री. किरण साळी, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. कुणाल टिळक, रिपब्लिकन पक्ष (ए)चे नेते श्री. मंदारभाऊ जोशी, श्री. गौरव बापट, भारतीय जनता पार्टी शहर सरचिटणीस राघवेंद्र मानकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते श्री. संदीपजी खर्डेकर, मा. नगरसेवक अशोक येनपुरे, योगेश समेळ, मा. नगरसेविका आरती कोंढरे, अजय खेडेकर, ओबीसी आघाडी अध्यक्ष नामदेव माळवदे, कसबा विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष राजेंद्र काकडे, श्री अजय दराडे, श्री निलेश जगताप, श्री कपिल जगताप, सरचिटणीस अमित कंक, चंद्रकांत पोटे, शिवसेनेचे सुधीर कुरूमकर, गणेश काची, प्रदीप गारटकर , दत्ताभाऊ सागरे, गौरव साइनकर, घनशाम भोसले, पुरुषोत्तम नांगरे, सुरेखाताई कदम, महेश शिंदे आदी महायुती आणि घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.